नगर जिल्ह्यात आज वाढले 165 रुग्ण, आतापर्यंत 1233 रुग्णांना डिस्चार्ज - In Nagar district today 165 patients increased, so far 1233 patients discharged | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात आज वाढले 165 रुग्ण, आतापर्यंत 1233 रुग्णांना डिस्चार्ज

मुरलीधर कराळे
मंगळवार, 21 जुलै 2020

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. नगरमध्येही अशा कारवाईची गरज आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच नगर शहरात जनता कर्फ्यू लावण्यासाठी नागरिकांमधूनही मागणी वाढत आहे.

नगर : जिल्ह्यात आज 165 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असून, आज 100 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात 1233 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

गेल्या २४ तासात १६५ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले. खासगी प्रयोगशाळेत व पोर्टलवर ८३ रुग्णांची नोंद झाली. अँटीजेन चाचण्यात ४१ रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९१५ इतकी झाली आहे. एकूण रुग्ण संख्या २१९२ इतकी झाली आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये गेल्या २४ तासात ४१ रुग्ण बाधित आढळून आले. नगर तालुक्यात 3 तर नगर शहरात आज 13 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये राहाता तालुक्यातील साकुरी येथे ३, पारनेर तालुक्यात 4 रुग्ण आढळले असून, ढवळपुरी २, सारोळा आडवाई १, किन्ही १ यांचा त्यामध्ये समावेश आहे.

श्रीगोंदे तालुक्यात आज १३ रुग्ण आढलले. त्यामध्ये घोगरगाव ४, काष्टी १, चिकलठाणवाडी १, चांडगाव १, कोळगाव १, देवदैठण ३, घारगाव २ यांचा समावेश आहे. पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. शेवगाव तालुक्यातील मंगरुळ येथे 1 व शेवगाव शहरात 1 रुग्ण आढळळला. श्रीरामपूरमध्येही 2 रुग्णांची नोंद झाली.

याशिवाय जलदगतीने कोरोना निदान करण्यासाठी आता अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये आज ४१ जण बाधित आढळले. त्यात श्रीरामपूर ९, नेवासा १६, कोपरगाव २, संगमनेर १०, कॅन्टोन्मेंट १, मनपा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८३ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.

नगर शहरात आता नव्याने आयुर्वेद काॅलेज येथे कोविड रुग्णालय सुरू झाले आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार होणे अधिक सुलभ होणार आहे. नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ग्रामीण भागातही वाढत आहे. जिल्ह्यातील कर्जत, शेवगाव, पाथर्डी, जामखेड आदी तालुक्यातील व्यवहार सध्या ठप्प आहेत. तेथे कोरोना आरोक्यात येण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. नगर शहरातही संपूर्ण लाॅकडाऊन करण्यासाठी पदाधिकारी मागणी करीत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. नगरमध्येही अशा कारवाईची गरज आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच नगर शहरात जनता कर्फ्यू लावण्यासाठी नागरिकांमधूनही मागणी वाढत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख