Nagar district reaches 183! Today six people are positive | Sarkarnama

नगर जिल्ह्याने गाठला 183 चा आकडा ! आज सहाजण पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 जून 2020

आज जिल्ह्यात ६ नवीन रुग्ण आढळले असून, ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव निगेटिव्ह आला आहे. शेवगाव तालुक्यातील रानेगाव येथील ३२ वर्षीय युवक बाधित आहे.

नगर : जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालात सहाजण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले. आतापर्य़ंत जिल्ह्याने 183 रुग्णाचा आकडा गाठला आहे.

जिल्ह्यातील आज आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील रुग्णांचा समावेश आहे. सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्हयातून नगर जिल्ह्यात आले होते. आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता ९० झाली आहे.

आज जिल्ह्यात ६ नवीन रुग्ण आढळले असून, ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव निगेटिव्ह आला आहे. शेवगाव तालुक्यातील रानेगाव येथील ३२ वर्षीय युवक बाधित आहे. यापूर्वी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील १० वर्षीय मुलगाही बाधित, तर लालबाग येथून घुलेवाडी (पारनेर) येथे आलेली २८ वर्षीय महिला बाधित झाली आहे. संगमनेर शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाली असून, कोल्हेवाडीरोड येथील १८ वर्षीय युवक बाधित, तर नवघरगल्ली येथील ३२ वर्षीय तरुणाला लागण झाली आहे. 

नगर शहरातील लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. महानगरपालिका क्षेत्र ३६, नगर जिल्हा ९४, इतर राज्य २, इतर देश ८, इतर जिल्ह्यातील ४३ जणांचा त्यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा...

राशीनच्या सरपंचांचा उपक्रम

राशीन : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास अटकाव घालण्यासाठी तसेच प्रत्येकाची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सरपंच नीलम साळवे, उपसरपंच शंकर देशमुख यांच्या पुढाकारातून राशीनमधील चार हजार कुटुंबास घरोघरी जाऊन आशा सेविकांमार्फत अर्सेनिक अल्बम -30 या गोळ्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले.

राशीममध्ये पुणे- मुंबईवरून आलेल्या रूग्णांमुळे कोरोना विषाणूची काही रुग्णांना बाधा झाली. त्या पार्श्वभूमीवर या गोळ्या वाटपाचा निर्णय राशीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. अर्सेनिक अल्बम - 30 या गोळ्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आल्याने या गोळ्या वाटण्याचा निर्णय घेतला असून, उर्वरित कुटुंबाना या गोळ्या पोहोच करणार असल्याचे सरपंच साळवे यांनी सांगितले.

चिलवडीत वडिलांच्या स्मरणार्थ वाटप

चिलवडी ( ता.कर्जत) येथे दीपक जाधव, डॉ. पंकज जाधव, डॉ. मनीषा जाधव यांनी स्वर्गीय हरिभाऊ जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी अर्सेनिक अल्बम -30 या गोळ्यांचे वाटप माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील, सरपंच कल्याण नवले यांच्या हस्ते चिलवडी ग्रामस्थांना करण्यात आले.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख