नगर जिल्ह्यात 48 वाढले, 62 जणांना डिस्चार्ज - In Nagar district 48 increased, 62 discharged | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात 48 वाढले, 62 जणांना डिस्चार्ज

मुरलीधर कराळे
बुधवार, 15 जुलै 2020

सध्या जिल्ह्यात 1124 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. बरे झालेल्यांची संख्या 727 असून, 367 उपचार घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

नगर : जिल्ह्यात आज नव्याने 48 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 62 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढण्याची संख्या 50 च्या आसपास असते. तथापि, तेवढेच रुग्ण कोरोनातून बरे होत आहेत. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 300 ते 500 च्या दरम्यान दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात 367 रुग्ण उपचार घेत आहेत. 

आज आलेल्या अहवालात 200 व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आली आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या 48 मध्ये नगर शहरातील ५, संगमनेर ३१, अकोले ५, अशा रुग्णाचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यात निमोण ३, कासार दुमाला २, गुंजाळ वाडी २, माहुली ८, साकुर १, तळेगाव दिघे १, वडगाव १, संगमनेर शहरातील १३ जण बाधित आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात देवठाण १, उंचाखडक १, चास ३ असे रुग्ण आढळून आले आहेत. नगर महापालिका क्षेत्रात ५ जण बाधित आढळून आले आहेत. खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर महापालिका हद्दीतील १, राहाता १ आणि संगमनेर तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यात 1124 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. बरे झालेल्यांची संख्या 727 असून, 367 उपचार घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कर्जत, अकोले तालुक्यात बहुतेक गावांमध्ये गाव बंद करून ग्रामस्थ प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. मात्र शहरात कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. असे असले, तरी शहरातील व्यवहार सुरूच आहेत. आगामी काळात संपूर्ण लाॅकडाऊन होण्याच्या भितीने नागरिक दुकानांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. शासकीय कार्यालयांमध्येही लोकांची गर्दी वाढतच आहे. आपले कामे लवकर आटोपण्यासाठी लोक अधिकाऱ्यांच्या मागे लागत असून, त्यामुळे गैरव्यवहाराला चालना मिळत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. अधिकारीही कोरोनाच्या नावाखाली कामे करण्याचे टाळत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. असे असले, तरी कोरोनाची भिती असतानाही अधिकारी कामे करतात. सुटी न घेता काम सुरू ठेवतात. हे कोरोना योद्धेच आहेत, असे मत अधिकारी व्यक्त करीत आहेत.

शहरात कोरोनाची हवी धास्ती

नगर शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेवून गर्दी कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. अनेक नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने दुकानदारांना, विक्रेत्यांना कोरोनाची बाधा होत असल्याने व्यावसायिकांमधून धास्ती घेतली जात आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख