नगर जिल्ह्यात 428 नवे रुग्ण, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69 टक्के - In Nagar district, 428 new patients, the cure rate is 69 percent | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात 428 नवे रुग्ण, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69 टक्के

मुरलीधर कराळे
गुरुवार, 30 जुलै 2020

आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 949 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 1 हजार 604 रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण रुग्णसंख्या 4 हजार 613 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांत भरच पडत आहे. आता चारशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येवू लागले आहे. असे असले, तरी बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यात काल रात्रीपासून आज सायंकाळपर्यंत कोरोना रुग्णसंख्येत 428 रुग्णांची भर पडली आहे. आज 228 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाम 69.80 टक्के आहे. 

जिल्ह्यात काल सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खासगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ६०४ इतकी झाली आहे.

आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४० रूग्ण आढळले होते. त्यानंतर या संख्येत आणखी १४ रुग्णांची भर पडली. यामध्ये संगमनेर तालुक्यातील निमोण येथे ५, तर जोरवे १ रुग्ण आढळला होता. श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे एक रुग्ण आढळला आहे. नगर तालुक्यातील चास येथे 1 रुग्ण आढळला. नगर शहरातील सारसनगरमध्ये 3 रुग्णांची वाढ झाली. पाथर्डी तालुक्यातील शहरात 1, तर पागोरी पिंपळगाव येथे 1 रुग्ण वाढला आहे. नेवासे तालुकातील तरवडी येथे 1 रुग्ण आढळला आहे.

अँटीजेन चाचणीत आज १२६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर २२, राहाता १, पाथर्डी २२, नगर तालुका १६, श्रीरामपुर २५,  कॅन्टोन्मेंट ६, नेवासा १६ आणि कर्जत १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २४८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, नगर शहर १८६, कर्जत २, राहुरी ४, अकोले १, श्रीगोंदा २, नेवासा २, श्रीरामपूर ३, नगर तालुका ९, पाथर्डी ७, राहाता १२, संगमनेर ७, पारनेर ७, शेवगाव ३ आणि जामखेड येथील ३ रुग्णाचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 949 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 1 हजार 604 रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण रुग्णसंख्या 4 हजार 613 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख