नगर कोरोना @ 22 हजार, मृत्यूने गाठले 300 - Nagar Corona @ 22 thousand, death reached 300 | Politics Marathi News - Sarkarnama

नगर कोरोना @ 22 हजार, मृत्यूने गाठले 300

मुरलीधर कराळे
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात आज नव्याने 610 रुग्ण बाधित आढळल्याने एकूण रुग्ण संख्या 22 हजार 82 झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूने 300 लोकांना गाठले आहे.

नगर : जिल्ह्यात आज नव्याने 610 रुग्ण बाधित आढळल्याने एकूण रुग्ण संख्या 22 हजार 82 झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूने 300 लोकांना गाठले आहे.

जिल्ह्यात आज ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.४ टक्के इतके झाले आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार २२५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४७, अँटीजेन चाचणीत ७४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६८, संगमनेर २५, पाथर्डी ७, नगर ग्रामीण २५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट ४, श्रीगोंदा ३८, पारनेर १४, अकोले २, राहुरी ५, शेवगाव ३६, कोपरगाव ९, जामखेड १ आणि मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ७४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर १०, राहाता १६, पाथर्डी २, श्रीरामपुर १५, कॅंटोन्मेंट ७, श्रीगोंदा १, अकोले २,  शेवगाव १, आणि कर्जत २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १४६, संगमनेर ३, राहाता १९, पाथर्डी ४,  नगर ग्रामीण २८, श्रीरामपुर २४,  कॅन्टोन्मेंट ७, नेवासा १७, श्रीगोंदा ५, पारनेर ७, अकोले २,  राहुरी १७, शेवगाव ३,  कोपरगांव २, जामखेड ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. आज ६८१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची च संख्या १८ हजार ५५७ झाली आहे. सध्या ३ हजार २२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृत्यू 300 झाले असून, जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ८२ रुग्णसंख्या झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख