भाजप आमदार राजळे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मुश्रीफ यांचा दाैरा - Mushrif's constituency in BJP MLA Rajale's constituency | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

भाजप आमदार राजळे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मुश्रीफ यांचा दाैरा

मुरलीधर कराळे
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

मदत देता आली नाही, तर विरोधी आमदार असल्याने मदत टाळली, असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर होईल, तर जास्त मदत दिली, तर या मतदारसंघात राष्ट्रवादीची काॅलर उंचावली जाईल.

नगर : पालकमंत्री या नात्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ उद्या (गुरुवारी) नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. हा मतदारसंघ भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचा आहे. त्यामुळे पाहणी, पंचनामे, मदत पुरेशी मिळेल का, जिल्ह्यात इतर जिल्ह्यातही पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री केवळ दोनच ठिकाणी पाहणी करणार असल्याने इतर तालुक्यातील नुकसानभरपाई मिळेल का, अशी शंका शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

पाककमंत्री मुश्रीफ उद्या सकाळी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील भालगाव व बोधेगाव येथे पिकाच्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी नगरला येऊन अतिवृष्टी आढावा व कोरोना आढावा घेतील. त्यानंतर पक्षातील पदाधिकारी व नेत्यांशी चर्चा करतील. दिवसभराच्या दाैऱ्यात ते केवळ दोन गावात नुकसान पाहणी करतील. केवळ पाहणी करून अहवाल देऊ नये, तर पालकमंत्र्यांनी तेथेच मदत जाहीर करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे.

शेवगाव-पाथर्डी हा मतदारसंघ भाजपच्या आमदार राजळे यांचा आहे. विरोधकांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते असलेले पालकमंत्री भरघोस मदत देतील का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. मदत देता आली नाही, तर विरोधी आमदार असल्याने मदत टाळली, असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर होईल, तर जास्त मदत दिली, तर या मतदारसंघात राष्ट्रवादीची काॅलर उंचावली जाईल. त्यामुळे हा विषय पालकमंत्री कसा हाताळतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख