मुश्रीफ कोरोना पाॅझिटिव्ह ! कालच्या त्यांच्या मिटिंगला होते हे अधिकारी - Mushrif Corona Positive! The officers were at their meeting yesterday | Politics Marathi News - Sarkarnama

मुश्रीफ कोरोना पाॅझिटिव्ह ! कालच्या त्यांच्या मिटिंगला होते हे अधिकारी

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

कालच (गुरुवारी) त्यांनी नगरमध्ये आढावा बैठक घेतली होती. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांचीही कोरोना तपासणी करावी लागणार आहे.

नगर : जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना तपासणीचा अहवाल आज पाॅझिटिव्ह आला असून, त्यांची तब्येत चांगली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे मुश्रीफ यांनी ट्विट करून सांगितले आहे. कालच (गुरुवारी) त्यांनी नगरमध्ये आढावा बैठक घेतली होती. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांचीही कोरोना तपासणी करावी लागणार आहे.

मुश्रीफ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की माझी कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.

दरम्यान, मुश्रीफ हे कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने त्यांच्यासोबत मिटिंगला असलेल्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. या आढावा मिटिंगसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार संग्राम जगताप, महापाैर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुनील पोखरणा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त अशोक राठोड, महापालिका आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डाॅ. दादासाहेब साळुंके आदी उपस्थित होते. तसेच मुश्रीफ यांना अनेक संघटनांनी तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदने दिली आहेत. त्यामुळे या सर्वांची चिंता वाढली आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख