मनपा अधिकारी पैठणकर लाचलुचपतच्या जाळ्यात - Municipal officer Paithankar caught in bribery trap | Politics Marathi News - Sarkarnama

मनपा अधिकारी पैठणकर लाचलुचपतच्या जाळ्यात

मुरलीधर कराळे
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

नगर महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख व उपआरोग्य अधिकारी डॉ. नरसिंह पैठणकर यांना अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले. लाचलुचपतच्या नाशिक विभागाने ही कारवाई केली. 

नगर : महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख व उपआरोग्य अधिकारी डॉ. नरसिंह पैठणकर यांना अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले. लाचलुचपतच्या नाशिक विभागाने ही कारवाई केली. 

डॉ. पैठणकर हे यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी निलंबित केले होते. मात्र तत्कालीन महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे पदाची सूत्रे येताच त्यांना पुन्हा कामावर हजर करून घेतले होते. त्यानंतरही त्यांच्या कार्यपद्धतीमुळे स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत ते टिकेचे केंद्र ठरले होते.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मृत जनावरांच्या दाहिनीचा प्रकल्प असून, त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून काही तृटी काढण्यात आल्या आहेत, असे सांगून त्या तक्रारी दूर करण्यासाठी तसेच राहिलेले बील काढण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच पैठणकर यांनी मागितली. संबंधितांनी लाचलुचतविभागाला याबाबत तक्रार दिली. त्यानुसार तक्रारदाराने सावेडी येथील कचरा डेपोजवळ पंचासमक्ष पैठणकर यांना लाच घेताना पकडले. 

हेही वाचा...

रिक्त सरपंचपदासाठी फेरआरक्षण !

 नगर : संबंधित संवर्गातील सदस्यांअभावी जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या जागा रिक्‍त राहिल्या. या ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाच्या फेरआरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या महिनाअखेर सरपंचनिवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

हेही वाचा... बापानेच केला चिमुरडीवर अत्याचार

कोरोनामुळे जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15 जानेवारीला निवडणुका होऊन 18 जानेवारीला निकाल जाहीर झाले. त्यानंतर सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानुसार अनेक ठिकाणी सरपंचांची निवड झाली. मात्र, जिल्ह्यातील 35 ठिकाणी सरपंचपद संबंधित संवर्गातील सदस्यांअभावी रिक्‍त राहिले होते. आता त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. 

एखाद्या संवर्गातील महिला सदस्य नसल्यास त्याच संवर्गातील पुरुषाला सरपंचपद देता येणार आहे. मात्र, महिला वा पुरुषही सदस्य नसल्यास, अशा ठिकाणी फेरआरक्षण काढले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार सरपंचपदाच्या फेरआरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिल्यानंतर आरक्षणाची सोडत जाहीर केली जाईल. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या सदस्यांना तीन दिवस अगोदर सूचित केले जाणार आहे. सदस्यांसमक्ष आरक्षणाची सोडत काढली जाणार असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली. 

हेही वाचा... तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू

सरपंचपद रिक्त राहिलेल्या ग्रामपंचायती 

कोपरगाव- तिळवणी, मढी खुर्द, येसगाव. श्रीरामपूर- गोवर्धनपूर, मातुलठाण, मांडवे, कुरणपूर. नेवासे- जळके खुर्द. राहुरी- चिंचाळे, उंबरे, वळण, मल्हारवाडी, धानोरे. शेवगाव- नवीन दहिफळ, नागलवाडी. श्रीगोंदे- घोडेगाव, वडाळी, आर्वी. जामखेड- गुरेवाडी. कर्जत- तिखी, टाकळी खंडेश्‍वरी, पिंपळवाडी, चिलवडी. नगर- रुईछत्तिशी, पिंप्री घुमट, धनगरवाडी. अकोले- कुंभेफळ, वाशेरे, घोडसरवाडी, जांभळे, परखतपूर, औरंगपूर, तांभोळ, इंदोरी आणि पिंपळगाव खांड. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख