नगर महापालिकेतील ते अधिकारी फरार, `अनैतिक`चे बिंग फोडणाऱ्या मुलास मारहाण

जुनाबाजार भागातील मैदानाजवळ संबंधित अल्पवयीन मुलाला चाैघांनी मारहाण केली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
marhan 2.jpg
marhan 2.jpg

नगर : महापालिकेतील दोन अधिकारी व कर्मचाऱ्याने एका मुलाच्या घरात घुसून दारू पिवून धिंगाणा घातल्याप्रकरणी दोघे अधिकारी व एक कर्मचारी अद्याप फरार आहे. या अधिकाऱ्यांच्या अनैतिक संबंधाचे बिंग फोडणाऱ्या त्या मुलाला काल काल दुपारनंतर चार अज्ञात व्यक्तींकडून मारहाण झाली. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळत चालले आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा पदभार महापालिकेने इतर अधिकाऱ्यांकडून दिला आहे.

जुनाबाजार भागातील मैदानाजवळ संबंधित अल्पवयीन मुलाला चाैघांनी मारहाण केली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे संबंधित त्या मुलाच्या जीवाला आता धोका निर्माण झाला आहे. 

महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ व एका कर्मचाऱ्याने बोल्हेगाव येथील मुलाच्या घरात घुसून दारू पिऊन गोंधळ घातला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे अनैतिक संबंधाच्या प्रकरणाबाबत त्या मुलाने बिंग फोडले होते. याबाबत अल्पवयीन मुलाने तोफखाना पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. तेव्हापासून संबंधित मुलाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात होती. गुन्हा दाखल झाल्यानतर दोन्ही अधिकारी डॉ. बोरगे व मिसाळ पसार झाले आहेत. 

संबंधित अधिकाऱ्याचा पदभार इतरांवर

महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे व अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते दोघेही पसार आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी त्या दोघांचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविला आहे.

डाॅ. बोरगे हे कोरोनासंदर्भात नोडल अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांचा पदभार आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अग्निशमन विभागाचा भार उपअभियंता कल्याण बल्लाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बल्लाळ यांची विद्युत विभागातून बदली करण्यात आली असून, त्यांना अतिक्रमणविरोधी विभागप्रमुख करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे महापालिकेची इज्जत चव्हाट्यावर आली आहे. नगर शहरात कोरोनाने धुमाकुळ घातला असताना कोरोनाविषयक काम पाहणारे नोडल अधिकारी मात्र नाजूक प्रकरणात अडकले आहेत. लोकांचे आरोग्याचा विचार करण्याऐवजी या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी नगरकरांच्या जीवाशी खेळले आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे शहरातील मोठा परिसर हाॅटस्पाॅट करण्याची वेळ आली आहे, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. त्यांच्यावर कडक  कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com