नगर महापालिकेला कोरोनाने घेरले ! भिस्तबाग हाॅट स्पाॅट, तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू

नगर महापालिकेतील एका अधिकाऱ्याला कोरोना झाल्यामुळे कर्मचारी कामावर येण्यास टाळाटाळ करू लागले आहे. महापालिकेचे कामकाज बंद करण्याचे वेळ येण्याची शक्यता आहे. आज जिल्ह्यात 23 जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत.
nagar mahapalika.jpg
nagar mahapalika.jpg

नगर : जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात 23 जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये नगर शहरातील 15 जणांचा समावेश आहे. काल एका तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. यापूर्वीही दोन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाल्याने व्यापाऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने कार्यालयात कर्मचारी काम करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे लवकरच महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. दुपारी भिस्तबाग परिसर हाॅट स्पाॅट म्हणून घोषित करण्यात आला.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. नगर शहरातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे. आज सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यातील 23 जण पाॅझिटिव्ह आढळले असून, त्यापैकी 15 जण नगर शहरातील आहेत. आज आढलेल्या रुग्णांमध्ये गवळीवाडा येथील नऊ, चितळेरोड येथील एक आणि शहराच्या मध्यवस्तीत चार जण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. भिस्तबाग परिसरातील पंचवटी काॅलनीत 16 रुग्ण आढळून आल्याने महापालिकेने तेथे आरोग्य विभागाने पथक पाठविले आहेत. 

नगर शहरातील बराचसा भाग आता हाॅट स्पाॅट झाला आहे. उपनगरांध्ये रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण नगर शहरात काही दिवसांसाठी जनता कर्फ्यु लावण्याचा प्रशासन विचार करीत आहे.

पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांत वाढ होत असून, आज भाळवणी येथील एका रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आढळला आहे. श्रीगोंदे शहरातील पाच, तर तालुक्यातील वडळी येथे एक रुग्ण आढळला आहे. संगमनेर येथेही रोज रुग्ण आढळत आहेत. या तालुक्यातील खेडे गावांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे बहुतेक गावं बंद करण्याची वेळ आली आहे.

जामखेडमध्ये तीन दिवस जनता कर्फ्यु करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जामखेड येथे उपाययोजना सुरू झाल्या आहेत. यापूर्वी या तालुक्याने कोरोनामुक्त होऊन आदर्श घडवून दिला आहे. जामखेड पॅटर्न राज्यात प्रसिद्ध झाला होता. नव्याने रुग्ण सापडू लागल्याने तेथे तहसीलदार व आमदारांच्या समन्वयातून उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

आज सकाळी 15 जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे सध्या रुग्णसंख्या 963 झाली असून, 292 जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 649 इतकी झाली आहे.

भिस्तबाग नव्याने हाॅट स्पाॅट

भिस्तबाग परिसरात 16 रुग्ण आढळून आल्याने आज दुपारी हा परिसर सील करण्यात आला. भिस्तबागसह आयोद्धानगर, काैशल घर, सुपर क्लिनर्स, उत्तरेकडील ओढा, सेंदूरकर घर, पिंपळकर, मचे घर ते काैशल हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. याबरोबरच बफर झोनमध्ये काैशल्यनगरी, शेजारील गजानन काॅलनी, संगीत नगर, दक्षिणेकडील सिमला काॅलनी, दत्तमंदिरपरिसर, विवेकानंद काॅलनी, विठ्ठल मंदिर परिसर, आशियाना काॅलनी, साईबन काॅलनी, किसनगिरीबाबा नगर आदी परिसराचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com