Municipal Corporation: Selection of 8 permanent seats, now the focus is on the post of Chairman | Sarkarnama

नगर महापालिका : `स्थायी`च्या 8 जागांच्या निवडी, आता लक्ष सभापतीपदाकडे

मुरलीधर कराळे
गुरुवार, 30 जुलै 2020

सध्या महापालिकेत भाजप सत्ताधारी आहे. स्थायी समतीचा सभापतीही भाजपचाच होण्याचे घाटत आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. या समतीच्या 8 जागा गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होत्या.

नगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या 8 सदस्यांच्या जागांसाठी निवड झाली असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काॅग्रेसचे 3, भाजप 2, शिवसेना 2, काॅंग्रेस 1 अशा सदस्यांचा समावेश आहे. आज आॅनलाईऩ सभा होऊन ही निवड झाली आहे. आता सभापतीपदी कोणाची वर्णी लागते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

सध्या महापालिकेत भाजप सत्ताधारी आहे. स्थायी समतीचा सभापतीही भाजपचाच होण्याचे घाटत आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. या समतीच्या 8 जागा गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होत्या. राज्य शासनाच्या जुलैमधील परिपत्रकानुसार या निवडी झाल्या आहेत. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने काढलेल्या आदेशानंतर आजही आॅनलाईन सभा बोलाविण्यात येवून या निवड करण्यात आल्या. महापाैर बाबासाहेब वाकळे, उपमहापाैर मालन ढोणे, सभागृह नेते स्वप्नील शिंदे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर तसेच अधिकारी या सभेस उपस्थित होते.

सभा सुरू होण्यापूर्वी महापाैरांकडे राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनी बंद पाकीटात आपल्या पक्षांच्या सदस्यांची नावे सादर केली होती. सभा सुरू झाल्यानंतर महापाैर वाकळे यांनी गटनेत्यांकडून मिळालेल्या नावांची यादी जाहीर केली. या रिक्त जागा भरल्यानंतर आता स्थायी समितीत शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे 5, भाजपचे 3, काॅंग्रेसचे 2 व बहुजन समाज पक्षाचे 1 असे 16 सदस्य झाले आहेत. यातून आता सभापतीपदाची निवड होणार असून, त्यासाठी राजकीय बांधणी सुरू आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व निवडणुका ठप्प आहेत. त्यामुळे स्थायीच्या सभापतीची निवडही काही दिवस रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थायी समितीचे नवीन सदस्य

राष्ट्रवादी - सागर बोरुडे, परवीन कुरेशी व प्रकाश भागानगरे

भाजप - मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे

शिवसेना - शाम नळकांडे व विजय पठारे

काॅंग्रेस - सुप्रिया जाधव

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख