मुंडे - विखे कुटुंबियांचे जुने ऋणानुबंध - Munde - Old bonds of Vikhe family | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

मुंडे - विखे कुटुंबियांचे जुने ऋणानुबंध

मुरलीधर कराळे
शनिवार, 12 डिसेंबर 2020
भगवानगड येथे आज खासदार विखे पाटील यांनी भेट देऊन (कै.) मुंडे यांच्या कार्याच्या आठवणी जागविल्या.

नगर : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कार्य आम्हाला मार्गदर्शक आहे. मुंडे व विखे पाटील हे दोन्ही कुटुंबियांत जुने ऋणानुबंध आहेत. आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही काम करीत आहोत. (कै.) मुंडे जयंतीनिमित्त आमचे येथे येणे आमच्यासाठी भाग्याचे आहे, असे मत खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

भगवानगड येथे आज खासदार विखे पाटील यांनी भेट देऊन (कै.) मुंडे यांच्या कार्याच्या आठवणी जागविल्या. मुंडे यांची भाषण शैली, त्यांची सर्वसामान्यांसाठी असलेली तळमळ आम्हाला प्रेरणादाई आहे, असे ते म्हणाले.

खासदार विखे पाटील म्हणाले, ``मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त येथे येणे हे आमच्यासाठी भाग्याचे आहे. ते नेहमी आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. मुंडे आणि विखे कुटुंबियांचे जुने ऋणानुबंध आहेत. हा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आज आम्ही पंकजाताई यांच्या नेतृत्त्वाखाील काम करीत आहोत. त्यांचे आशीर्वाद घेणे क्रमप्राप्त आहे. असा नेता महाराष्ट्रात पहायला मिळत नाहीत. साहेब हे साहेबच होते, आणि साहेबच राहणार आहेत.``

भगवानगडावर आज अनेक भाजप कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. (कै.) मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी मुंडे यांना मानणाऱ्या अनेक ग्रामस्थांनी हजेरी लावत विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. मुंडे यांच्या सभा या गडावर विशेष गाजल्या. ते हयात असताना झालेल्या सभांचे भाषणाचे आपण साक्षीदार होतो. कोणत्या सभेत मुंडे काय बोलले, याबाबत लोकांनी चर्चा करून त्यांच्या भाषणाच्या शैलीचे काैतुक केले. मुंडे यांनी केलेल्या कामांबाबत चर्चा करून असा नेता पुन्हा होणे नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख