मुंबई महापालिका ! शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी ? कॉंग्रेसची वेगळी चूल - Mumbai Municipal Corporation! Shiv Sena-NCP alliance? A different side of Congress | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई महापालिका ! शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी ? कॉंग्रेसची वेगळी चूल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी सोबत लढणार असल्याचे दावे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केले जात आहे; मात्र काॅंग्रेसच्या मुंबईतील नेतृत्वाने ही निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉॅंग्रेस ही निवडणूक सोबत लढण्याची शक्‍यता आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले. त्यामुळे आता सर्वच महापालिकेच्या निवडणुका सोबत लढण्याचा विचार या पक्षांकडून केला जात आहे.

शिवसेनेसह राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून तसे संकेतही दिले जात आहेत; मात्र काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने याबाबत कोणतेही थेट विधान केलेले नाही. त्यातच, मुंबई काॅंग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह नव्या कार्यकरणीतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी आगामी महापालिका नवडणुक स्वतंत्र लढण्याची भुमिका जाहीर केली आहे.

महानगर पालिकेची आगामी निवडणुक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. शिवसेनेने यासाठी बैठका सुरु केल्या आहेत; तर भाजपनेही आता महापालिकेत आक्रमक भुमिका घेण्यास सुरवात केली आहे. कॉंग्रेसनेही मुंबईतील अनेक मुद्दे लावून धरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुक कॉंग्रेस स्वतंत्र लढण्याची जास्त शक्‍यता आहे.

मराठी मतदारांचा फायदा

मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेचा प्रमुख मतदार हा मराठी आहे. या दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यास त्यांना याचा फायदा होण्याची शक्‍यता. त्यामुळे पालिका निवडणुकीत ही आघाडी होण्याची जास्त शक्‍यता आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख