कारखान्यांना जेवढे कर्ज दिले, तेव्हढेच शेतकऱ्यांनाही दिले : कर्डिले - As much as he gave loans to factories, he also gave loans to farmers: Kardile | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कारखान्यांना जेवढे कर्ज दिले, तेव्हढेच शेतकऱ्यांनाही दिले : कर्डिले

राजेंद्र सावंत
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

वृद्धेश्वर कारखाना चांगल्या पद्धतीने चालविला आहे. कोरोना संकटामुळे साखरेला उठाव नाही. त्यामुळे उपपदार्थांची निर्मिती करावी. तोट्यातला राहुरी कारखाना आम्ही विखेंच्या नेतृत्वाखाली चांगला चालविला.

पाथर्डी : ""जिल्हा सहकारी बॅंकेने कारखान्याला जेवढे पैसे कर्जाऊ दिले, त्यापेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांना कर्ज म्हणून दिले आहेत. वृद्धेश्वर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी बजावली आहे. कारखान्याने उपपदार्थ निर्मिती करावी. शेतकरी, ऊसउत्पादक व आमदार मोनिका राजळे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. जिल्हा सहकारी बॅंकेत राजकारणविरहित निर्णय घेतले जातात,'' असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले. 

श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, आमदार मोनिका राजळे, राहुल राजळे, कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, उद्धव वाघ, रावसाहेब वर्पे, माणिक खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, सुभाष ताठे, सोमनाथ खेडकर, नंदकुमार शेळके, अभय आव्हाड, बापूसाहेब पाटेकर, ताराचंद लोंढे, मंगल कोकाटे, अशोक चोरमले, दिनेश लव्हाट आदी उपस्थित होते. 

कर्डिले म्हणाले, ""वृद्धेश्वर कारखाना चांगल्या पद्धतीने चालविला आहे. कोरोना संकटामुळे साखरेला उठाव नाही. त्यामुळे उपपदार्थांची निर्मिती करावी. तोट्यातला राहुरी कारखाना आम्ही विखेंच्या नेतृत्वाखाली चांगला चालविला. शेतकरी, कारखान्याचे कामगार व संचालक मंडळावर विश्वास ठेवून जिल्हा बॅंकेकडून कर्जवाटप केले जाते. या वर्षी चांगले गाळप होऊन हंगाम यशस्वी होईल.''

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख