खासदार विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी साडेचारशे कोटींचा निधी

आपण रस्त्याच्या वस्तुस्थिती मांडली. त्यांनी तात्काळ प्रस्तावासाठी आदेश दिले. यासाठी कन्सल्टंट नेमला. हा सिन्नर- सावळीविहीर फाटा ते नगर असे त्यांचे नियोजन आहे.
20200420_082159.jpg
20200420_082159.jpg

नगर : खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगर- मनमाड महामार्गावरील सावळीविहिर ते नगरपर्यंतच्या कामासाठी साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. डांबरीकरणासह काही ठिकाणी काॅंक्रेटिकरणाच्या क्राॅंक्रीटिकरण करण्याच्या कामास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दिला आहे. यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, येत्या तीन ते चार महिन्यांत या रस्त्याच्या कामास प्रारंभ होईल, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारी होत्या. याबाबत काही नेत्यांनीही आवाज उठविला होता. खासदार डाॅ. विखे पाटील यांनी मात्र या कामासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला. 

गणेश कारखान्यावर गाळप हंगामाच्या प्रारंभानंतर डॉ. विखे पाटील बोलत होते. नगर- मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, दयनिय अवस्था झालेल्या या महामार्गाची परिस्थिती व फोटो खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून निदर्शनास आणून दिली. त्यानंतर गडकरी यांनी या महामार्गाच्या कामाबाबद प्रस्ताव करण्याबाबदचे आदेश त्यांनी दिले.

अधिक माहिती देताना खासदार डॉ. विखे म्हणाले, की आपण रस्त्याच्या वस्तुस्थिती मांडली. त्यांनी तात्काळ प्रस्तावासाठी आदेश दिले. यासाठी कन्सल्टंट नेमला. हा सिन्नर- सावळीविहीर फाटा ते नगर असे त्यांचे नियोजन आहे. हा रस्ता सावळीविहीर फाट्यापासुन सुरु होईल, तो नगरच्या विळदच्या बायपासपर्यंत असेल. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्याला मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तीसगाव फाटा ते कोल्हार या अंतरात पुन्हा काॅंक्रेटिकरण  काॅंक्रेटिकरण होणार आहे. हा संपूर्ण चौपदरी  रस्ता आहे. सावळीविहीर ते नगरच्या विळदपर्यंत या रस्त्याच्या डांबरीकरणाबरोबरच 20 ते 25 किलोमीटर अंतरातील रस्ता काॅंक्रेटिकरणासाठी घेतला आहे. या रस्त्याचे तीन भाग होतील, त्यात पूर्णपणे तोडून नवा करणे, काॅंक्रेटिकरण करणे व आहे त्या परिस्थितीत ओव्हरलेयर करणे, असे तीन भाग असल्याचे डाॅ. विखे म्हणाले.

या कामाचा आपण पाठपुरावा करीत आहोत. ते होईलही आपण रस्त्याची स्थिती पाहुन त्यास मंजुरी मिळवून घेतली. तीन महिन्याने काम सुरु होईल, असे सांगत खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, की हा रस्ता झाल्यानंतर या रस्त्याचा सर्वसामान्यांना होणारा त्रास नाहिसा होईल. गेल्या अनेक दिवसांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच या रस्त्याचे काम सुरू होऊ शकेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com