खासदार विखे पाटलांनी चालविली रिक्षा, अन सरकारवर केली अशीही टीका - MP Vikhe Patil drove a rickshaw and criticized the government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

खासदार विखे पाटलांनी चालविली रिक्षा, अन सरकारवर केली अशीही टीका

मुरलीधर कराळे
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

खासदार विखे पाटील यांनी रिक्षा चालवून पाहण्यासाठी सुरू केली. त्या वेळी बाजुला असलेल्या एका कार्यकर्त्याने सांगितले, पुढचे बाजुला व्हा रे, या वक्तव्याने हंशा पिकला.

नगर : भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी आज तीनचाकी रीक्षा चालवून पाहिली. ही रीक्षा चालविणे अवघड आहे. त्यामुळे तिनचाकी सरकार चालणेही मुश्किल आहे, असे सांगत त्यांनी हे सरकार पाच वर्षे टिकूच शकत नाही, असे ठामपणे सांगितले.

माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या श्रीरामपूर येथील जनसंपर्क कार्यालयात कोरोना तपासणी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खासदार विखे पाटील आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी तीन चाकी रिक्षा चालवून पाहिली. त्यानंतर महाआघाडी सरकारवर भाष्य करून टीका केली.

खासदार विखे पाटील म्हणाले, की तिन चाकी चालविणे एव्हढे सोपे नाही. ही रिक्षा चालविताना गती हळू केली. स्पिड ब्रेकर आल्यानंतर हळू घेतली. त्यात बसलेल्या पेसेंजरला भिती वाटत होती. त्यामुळे या रिक्षाप्रमाणेच तिनचाकी सरकार चालविणे किती अवघड आहे, हे लक्षात आले. त्यामुळे हे किती दिवस चालेल, किती स्थिर चालेल, त्यामध्ये बसलेले लोकं किती घाबरून आहेत, हे पाहिले, तर प्रत्येकाने एकदा तरी तिनचाकी वाहन चालवून पहावे. त्याचा अनुभव घ्यावा. मला पूर्ण खात्री आहे, की हे सरकार सर्व पातळीवर फेल झाले आहे. दुध दरवाढ देऊ शकले नाही. हे सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेल झाले आहे. पिकाच्या नुकसानीचे पंचनामे नाहीत. नवीन पंचनामेही नाहीत. अशा अनेक अडचणीत सापडलेले हे सरकार पाच वर्ष चालूच शकत नाहीत, याचा मला विश्वास वाटतो, असे खासदार विखे पाटील यांनी सांगितले.

त्या वक्तव्यावर हंशा

खासदार विखे पाटील यांनी रिक्षा चालवून पाहण्यासाठी सुरू केली. त्या वेळी बाजुला असलेल्या एका कार्यकर्त्याने सांगितले, पुढचे बाजुला व्हा रे, या वक्तव्याने हंशा पिकला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख