खासदार सुजय विखे म्हणतात, उंचीवर दगड फेकला की तो स्वतःच्याच अंगावर येतो - MP Sujay Vikhe says that if a stone is thrown at a height, it falls on its own body | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

खासदार सुजय विखे म्हणतात, उंचीवर दगड फेकला की तो स्वतःच्याच अंगावर येतो

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

एक जुनी म्हण आहे, `उंचीवर दगड फेकला की तो स्वतःच्याच अंगावर येतो.` अशीच अवस्था सध्या काही आमदारांची झाली आहे.

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जाऊ शकत नाही. जे आमदार टीका करीत असतील, त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. टीका करण्याआधी आपण काय कामे केली, ते लोकांसमोर ठेवावेत, असे आवाहन भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला केले.

माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की एक जुनी म्हण आहे, `उंचीवर दगड फेकला की तो स्वतःच्याच अंगावर येतो.` अशीच अवस्था सध्या काही आमदारांची झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षभरात एकही चांगले काम केले नाही. या सरकारवर कोणीच समाधानी नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी नाही. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे व्यापारी अडचणीत आहेत. जनता तर अनेक प्रश्नांनी होरपळून निघत आहे. असे असताना या सरकारने लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे. त्यांनी केंद्रावर टीका करण्यापेक्षा वर्षभरात काही कामे केली असतील, तर त्याचेच प्रदर्शन करावे. त्याची प्रसिद्धी करावी. त्यांच्याकडे सांगण्यासारखे एकही काम नाही. एकही काम नसल्याने जनतेला दाखविण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही. केंद्रावर टीका करण्याचे कारण नाही. भारतातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्यावर मोठा विश्वास ठेवला आहे, असे खासदार डाॅ. विखे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्या भाजपचे नेते महाविकास आघाडीवर जोरदार टीका करीत आहेत. गेल्या आठवड्यात माजीमंत्री शिवाजी कर्डिले, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सरकारवर टीकाश्र सोडले. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडी सरकार पडेल, असे भाकीत या नेत्यांनी केले होते. आता खासदार विखे पाटील यांनीही महाविकास आघाडी सरकार ताशेरे ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्रातील काही आमदारांनी टीका केली होती. त्यावर डाॅ. विखे पाटील यांनी मतप्रदर्शन करीत संबंधित आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधानांनी देशपातळीवर राबविलेल्या विविध योजनांमुळे सर्वसामान्यांना मोठा आधार होत आहे. योजनांचा फायदा घेऊन अनेक लहान-मोठे उद्योग उभारले जात आहेत. असे असताना केवळ राजकीय आकसापोटी पंतप्रधानांवर टीका होत असल्याचे मत खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मोदी यांचे व्यक्तीमत्त्वच असे आहे, की त्यांच्यावर टीका होऊ शकत नाही. जे आमदार टीका करतात त्यांनी त्यांचे स्वतःचे काम तपासावे, आत्मपरीक्षण करावे, अशी टीका करून त्यांचा समाचार घेतला आहे.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख