श्रीगोंदा पॅटर्न पारनेर तालुक्यात राबविण्याचे खासदार डाॅ. विखे यांचे आश्वासन - MP Dr. to implement Shrigonda pattern in Parner taluka. Vikhe's assurance | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीगोंदा पॅटर्न पारनेर तालुक्यात राबविण्याचे खासदार डाॅ. विखे यांचे आश्वासन

सनी सोनावळे 
मंगळवार, 6 एप्रिल 2021

मला बाकी विषयावर बोलण्यात वेळ घालायचा नाही. लाभार्थी शेतकरी वंचित राहता कामा नये, हीच भूमिका आपली आहे. समाजाचे प्रश्न सोडले म्हणजे मी समाधानी आहे, असे वाटले पाहिजे.

टाकळी ढोकेश्वर : आपला लढा आपणचं उभारला पाहिले. शेतकऱ्यांची पाणी वाटप संस्था गरजेची आहे. पाटबंधारे विभागाकडे कर्मचारी वर्ग कमी असेल, तर माझी यंत्रणा दिली जाईल. जसे श्रीगोंद्यात केले, तोच पॅटर्न आपण पारनेरमध्ये राबवू व शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

अळकुटी (ता. पारनेर) येथे पिंपळगाव जोगे पाणी प्रश्नावर अधिकारी व लाभार्थी शेतकरी यांची विखे यांच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
डाॅ. विखे म्हणाले, की मला बाकी विषयावर बोलण्यात वेळ घालायचा नाही. लाभार्थी शेतकरी वंचित राहता कामा नये, हीच भूमिका आपली आहे. समाजाचे प्रश्न सोडले म्हणजे मी समाधानी आहे, असे वाटले पाहिजे. मी जनतेचा टाळ्या वाजवून घेणारा खासदार मुळीच नाही. यांची जाणिव तुम्हाला भविष्यात येईल. यासंदर्भात गुरूवारी पुन्हा बैठक घेण्यात येईल.

या वेळी सभापती गणेश शेळके विश्वनाथ कोरडे, डाॅ. भास्कर शिरोळे, राहुल शिंदे, दिनेश बाबर, सचिन वराळ, शरद घोलप, डाॅ. कोमल भंडारी उपस्थित होते.

त्यागाशिवाय राजकारण टिकणे अशक्य

मला पंधरा हजाराने तालुक्यात मताधिक्य आहे. त्यामुळे श्रेयवादात पडण्यापेक्षा लाभार्थी शेतकऱ्यांना न्याय देण्याची माझी भुमिका आहे. तालुक्यात आल्यावर माझ्या गाडीत महाविकास आघाडी असते. त्यामुळे त्यागाशिवाय राजकारण टिकणे शक्य नाही, असे मत खासदार डाॅ. विखे पाटील यांनी व्यक्त केले.

 

हेही वाचा..

विजप्रश्‍नी राशीन विजउपकेंद्रात ठिय्या

राशीन : गेल्या सहा महिन्यांपासून बारडगाव दगडी परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. विजेची स्थिती असून अडचण नसून खोळंबा, अशी झाल्याने बारडगाव दगडी परिसरातील विजप्रश्‍नी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज राशीन येथील विजउपकेंद्राच्या दारात बसून ठिय्या दिला.

या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते भुजंग कदम, डॉ. चमस थोरात, शहाजी कदम, दत्ता ढगे, अतुल सौताडे, नवनाथ काळे, विकास थोरात, मनोहर ढगे, भाऊ निंबोरे, भरत कदम, शशिकांत लेणे, भाऊ राऊत, सद्दाम काझी, रौफ काझी, निलेश केदारी यांच्यासह येसवडी, तळवडी, बारडगाव दगडी परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. 

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केवळ तीन ते चार तास अत्यंत कमी दाबाने विज उपलब्ध होत असल्याची तक्रार करीत तळवडी फिडरवर असणारी जादा रोहित्र कमी करून ती राक्षसवाडी फिडरला जोडावीत तसेच पिंपळवाडीची काही रोहित्र ही तेथील फिडरवर जोडून बारडगाव परीसराची विज सुरळीत करण्याची मागणी केली.

ही मागणी मान्य करीत असल्याचे सांगत येत्या तीन दिवसात बारडगाव परिसराची विज सुरळीत करण्याचे आश्‍वासन महावितरणचे सहायक अभियंता संदीप जाधव यांनी दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख