जिल्ह्यात सहा हजारांहून अधिक रुग्ण बरे, आज 483 दाखल - More than six thousand patients healed in the district, 483 admitted today | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्ह्यात सहा हजारांहून अधिक रुग्ण बरे, आज 483 दाखल

मुरलीधर कराळे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजार 250 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 3 हजार 367 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज नव्याने 6 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यू झालेल्यांची संख्या 106 झाली आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनारुग्णसंख्या रोज वाढत आहे. कोरोना चाचणीत वाढ झाल्यामुळे जास्तीत जास्त लोकांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे सापडलेल्या रुग्णांमुळे त्यांच्यापासून इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होणार आहे.

जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आजपर्यंत घरी परतणाऱ्यांची संख्या ६ हजार २५० झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ६४.२५  इतकी आहे. आज नव्याने ४८३ रुग्णांची वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ३६७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका २३, संगमनेर १, राहाता १, नगर ग्रामीण १०, कँटोन्मेंट १, नेवासे २, शेवगाव १ आणि कोपरगांव २ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २५७ जण बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर ३३, राहाता २२, पाथर्डी ४८, नगर तालुका १३, श्रीरामपुर ६, कॅन्टोन्मेंट २१, नेवासे २१, श्रीगोंदा २१, पारनेर ११, अकोले ४, राहुरी १०, शेवगाव ९, कोपरगाव ४, जामखेड १० आणि कर्जत २४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा १४७, संगमनेर ९, पाथर्डी १, नगर ग्रामीण ८, श्रीरामपूर ३, कॅन्टोन्मेंट ४,  नेवासा १, श्रीगोंदे १, पारनेर २, अकोले २, राहुरी ५, शेवगाव १ आणि कोपरगाव १ अशा रुग्णांचा समावेश आहे. आज एकूण ३८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजार 250 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 3 हजार 367 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज नव्याने 6 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यू झालेल्यांची संख्या 106 झाली आहे.

उद्या रुग्ण संख्या दहा हजारांवर जाणार

दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे रोज पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळत असून, ती संख्या आज 9 हजार 723 झाली आहे. उद्या ही आकडेवारी 10 हजारांचा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश येत असून, अनेक शहरांत कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. नगरमध्येही चाचण्या वाढविल्यामुळे रुग्ण वाढल्याचे दिसणार असून, नंतर ते कमी होत जातील, अशी आशा प्रशासनाला आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख