लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरुद्ध या कारणासाठी मोक्का  - Mocca for this reason against eight people, including Lawrence Swamy | Politics Marathi News - Sarkarnama

लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरुद्ध या कारणासाठी मोक्का 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 डिसेंबर 2020

नगर-सोलापूर रस्त्यावरील भिंगार छावणी परिषदेच्या जकात नाक्‍यावर काही तरुणांनी धुडगूस घालून कर्मचाऱ्यांना मारहाण करीत दरोडा घातला होता. त्यात लॉरेन्स स्वामीसह वरील आरोपींची नावे निष्पन्न झाली होती.

नगर : दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी "मोक्का' च्या प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविला होता. त्याला डॉ. दिघावकर यांनी मंजुरी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 

प्रकाश भिंगारदिवे (रा. निंबोडी), संदीप शिंदे (रा. बुरूडगाव रस्ता), विक्रम गायकवाड (रा. वाळूंज, ता. नगर), बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव, संदीप भिंगारदिवे, बाळासाहेब भिंगारदिवे, लॉरेन्स दोराई स्वामी (रा. भिंगार) अशी त्यांची नावे आहेत. 

नगर-सोलापूर रस्त्यावरील भिंगार छावणी परिषदेच्या जकात नाक्‍यावर काही तरुणांनी धुडगूस घालून कर्मचाऱ्यांना मारहाण करीत दरोडा घातला होता. त्यात लॉरेन्स स्वामीसह वरील आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. 

भिंगार पोलिसांनी सिनेस्टाईल लॉरेन्स स्वामी याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. लॉरेन्स स्वामीसह अन्य आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी तो प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविला. डॉ. दिघावकर यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. 

 

हेही वाचा...

यंदा चिंच होणार अधिक आंबट

नेवासे : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर, तर काहींनी फळबाग योजनांतर्गत साठ हेक्टरवर चिंचेची लागवड केलेली आहे. शेतकऱ्यांना वरदान ठरणारी चिंचेचे यंदा मोठ्याप्रमाणात उत्पादन वाढले आहे. त्यामुळे चिंचेला भाव मिळणार नसल्याने यावर्षी 'गोड चिंच' शेतकऱ्यांसाठी 'आंबट' ठरणार आहे असे दिसत आहे. 

ग्रामीण भागात बांधावर आंबा, चिंच झाडांची लागवड केली जात होती. चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते. त्यामुळे बांधावर, वस्त्यांभोवती चिंचेच्या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

चिंचेपासून खाद्य पदार्थ, औषधे, चिंचोकापासून विविध पदार्थ बनवले जातात. त्याबरोबर स्वयंपाक घरात रोज चिंच, चिंचपाणी वापरतात. शासनाने फळबाग योजनेंतर्गत 1995 पासून शंभर टक्के अनुदान दिल्याने बांधावरील चिंच लागवड शेतकऱ्यांनी हेक्टरवर केली आहे. 

गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे चिंचेला फुलोरा कमी प्रमाणात आल्याने फळधारणा कमी झाली. यामुळे उत्पादनात घाट झाल्याने चिंचेला चांगला चांगला मिळाला होता. यंदा पावसाने जूनपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत पंधरा ते तीस दिवस अंतर ठेवल्याने चिंचेच्या झाडाला मोहर चांगला आला होता. आता चिंचा मोठ्या प्रमाणात लागल्याने उत्पादन वाढणार असल्याने दर कमी मिळणार असल्याने शेतकऱ्यांची गोड चिंच आंबट होणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख