पारनेर नगरपंचायतीची निवडणूक मनसे स्वबळावर लढविणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन नुकताच महाराष्ट्र नवनिर्माणसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांची पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्षपदीनिवड झाली आहे.
parner nagar panchayat.jpg
parner nagar panchayat.jpg

पारनेर : ``आम्ही लवकरच तालुका दौऱ्याचे नियोजन करत आहोत. `गाव तेथे शाखा` ही आमची संकल्पना आहे. मनसेत इतर पक्षातील अनेक नाराज कार्यकर्ते येण्यास तयार आहेत. भविष्यात तालुक्यातील येऊ घातलेल्या ग्रामपंचायत व पारनेर नगरपंचायतीची निवडणूक आम्ही स्वबळावर लढविणार आहोत,`` अशी माहिती महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब  माळी यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांची पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे.

माळी यांनी पदभार स्विकारल्यानंतर लगेचच तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्याचा सपाटा लावला आहे. अनेक गावात कार्यक्रम घेऊन त्यांनी कार्कर्ते जोडण्यास सुरूवात केली आहे. नुकताच वडझिरे येथे माळी यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

पारनेर शहरात शहराध्यक्ष वसीम राजे यांनी तालुक्याच्या ठिकाणी कोरोना काळात गरजुंना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच मास्क व सॅनिटायझरचे वाटप कले आहे. त्यांनी शहरात सध्या ध्वणीफिती द्वारे कोरोना विषयक जनजागृती सुरू करून एक चांगले सामाजिक काम हाती घेतले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातून पारनेर शहरात विविध कामानिमित्ताने येणाऱ्या लोकांचेही कोरोनाबाबत चांगले प्रबोधन होत आहे.

माळी यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नुकताच वडझिरे येथे कार्यक्रमात झाला. अवघ्या आठवडाभरातच पक्ष संघटनेला बळ मिळण्यास सुरूवात झाली असल्याचा प्रत्यय येथे आला. माळी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात या वेळी अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला. 

या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के, सतीश म्हस्के, वसीम राजे, तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे, प्रकाश राजदेव, निखिल बोरकर, स्वप्निल आतकर, सौरभ बेलोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सध्या कोणत्याही निवडणुका नसातानाही तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे अनेक गावात नवनविन कार्यकर्ते जोडण्याचे काम पक्षाने सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याने तालुक्यातील अनेक कार्यकर्ते नव्याने मनसेकडे येत आहेत. त्यामुळे भविष्यात तालुक्यात मनसे मोठी उभारी घेईल, अशी चिन्ह दिसू लागली आहेत.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com