होणाऱ्याच कामावर आमदार बोलतात : पिचड यांचा डाॅ. लहामटे यांना टोला - MLAs speak on the work to be done: Dr. Pichad Tola to Lahamate | Politics Marathi News - Sarkarnama

होणाऱ्याच कामावर आमदार बोलतात : पिचड यांचा डाॅ. लहामटे यांना टोला

शांताराम काळे
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

बाळासाहेब विखे पाटील, मधुकरराव पिचड यांनी कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ते प्रवरेत वळवून त्याचा फायदा जिल्ह्यासह दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्याला मिळावा म्हणून वळण बंधारे करण्याचे ठरविले.

अकोले : तालुक्‍यात वळन बंधारे होतीलच, मात्र प्रवरेतील प्रोफाईल वॉल बांधून तालुक्‍यात पाण्याची उपलब्धता करून देणे आवश्‍यक असताना तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी जे काम होणार आहे, त्याबाबत बोलतात. त्यापेक्षा प्रोफाईल वॉल बांधून तसेच सरकार दरबारी आपले वजन वापरून तालुक्‍याला पाणी उपलब्धता करून देणार आहेत का नाही? असा सवाल माजी आमदार वैभव पिचड यांनी उपस्थित केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना ते पिचड म्हणाले, की बाळासाहेब विखे पाटील, मधुकरराव पिचड यांनी कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ते प्रवरेत वळवून त्याचा फायदा जिल्ह्यासह दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्याला मिळावा म्हणून वळण बंधारे करण्याचे ठरविले. तत्कालीन सरकारने त्याला मंजुरी दिली होती. यापुढेही तो विषय सरकारी पातळीवर होणार आहेच, मात्र प्रोफाईल वॉलसाठी 12 जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, माजी मंत्री पिचड यांनी त्यास मंजुरी देखील घेतली आहे.

केंद्रीय जल आयोगाने त्यास मान्यता दिली आहे. मग हा प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्‍यक असताना तालुक्‍याच्या आमदारांनी जलसंपदा विभाग व सरकार दरबारी आपले वजन वापरून ज्या गोष्टी आवश्‍यक आहेत. त्याकडे लक्ष्य देऊन हा प्रश्न सरकारकडे आग्रही भूमिका घेऊन सोडविणे आवश्‍यक आहे. कालव्याच्या प्रश्न सोडविणासाठी म्हालादेवी पुल, पिंपरकणे पुल ही कामे मार्गी लागणे आवश्‍यक आहे. युती सरकारच्या काळात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेतल्यामुळे पुलाचे काम झाले, मात्र गेली वर्षभरापासून हे काम बंद आहे.

त्यासाठी निधीची आवश्‍यकता असून, तो निधी आणून काम सुरू होणे आवश्‍यक आहे, असेही पिचड यांनी स्पष्ट केले. तालुक्‍यात पाणी अडविण्यासाठी साईड उपलब्ध असून त्याचे प्रस्ताव सरकार दरबारी पाठवून मंजुरी आणणे आवश्‍यक आहे. मात्र त्याबाबत उदासीनता आहे. किमान एखादा बंधारा तरी मंजूर करा, असा टोमणा पिचड यांनी लगावला. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख