युवक काॅंग्रेस बळकटीकरणासाठी आमदार झनक यांचा झंजावात - MLA Zhanak's storm for strengthening the Youth Congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

युवक काॅंग्रेस बळकटीकरणासाठी आमदार झनक यांचा झंजावात

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

मुंबईहून वाशीमकडे जाताना आमदार झनक यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस विनायकराव देशमुख यांच्या नगर येथील संपर्क कार्यालयास भेट दिली.

नगर : "राज्यातील ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण युवक काँग्रेस संघटना बळकट करणार आहोत," असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमित झनक यांनी केले. 

मुंबईहून वाशीमकडे जाताना आमदार झनक यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस विनायकराव देशमुख यांच्या नगर येथील संपर्क कार्यालयास भेट दिली, त्याप्रसंगी झनक बोलत होते. प्रारंभी नगर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस हर्षवर्धन देशमुख यांनी प्रास्ताविक करून त्यांचे स्वागत केले.

या वेळी बोलताना आमदार अमित झनक म्हणाले, "माझे वडील स्व. सुभाषराव झनक व विनायकराव देशमुख यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. मागील पाच वर्षांपासून संघटनेत काम करताना देशमुख यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. आता देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घ्यावा."

आमदार अमित झनक यांना शुभेच्छा देताना विनायकराव देशमुख म्हणाले, "आमदार अमित यांचे वय व नम्रपणे काम करण्याची पध्दत पाहता आगामी काळात त्यांना राज्यस्तरावर अधिक मोठी जबाबदारी मिळणार आहे. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांचे आशिर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहेत."

या वेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत ओगले, विशाल रोहकले, ज्ञानेश्वर आव्हाड, प्रदीप बरबडे, नितेश वराडे आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख