श्रीरामपूरची `धावपट्टी`वर आमदार विखे पाटलांचे राजकीय षटकार - MLA Vikhe Patil's political six on the runway of Shrirampur | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीरामपूरची `धावपट्टी`वर आमदार विखे पाटलांचे राजकीय षटकार

मुरलीधर कराळे
शनिवार, 16 जानेवारी 2021

माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नानासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पेर्धेचा प्रारंभ आमदार विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

नगर : माजी आमदार (कै.) जयंत ससाणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय षटकार मारले.  

श्रीरामपूरची धावपट्टी एवढी सोपी नाही. इथे सगळ्या प्रकारचे चेंडू टाकावे लागतात, कारण गोलंदाज फलंदाज तरबेज आहेत. कोण कोणत्या संघात आहे, हे समजत नाही, पण या स्पर्धेतून श्रीरामपूरचा कप्तान निश्चित ठरेल, असे सूचक वक्तव्य विखे पाटील यांनी केले.

माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नानासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पेर्धेचा प्रारंभ आमदार विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या उद्घाटनाच्या निमित्ताने माजी सभापती नानासाहेब पवार, अंबादास ढोकचौळे, नगराध्यक्ष अनिल कांबळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

स्व. जयंत ससाणे यांच्या स्मृति या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा जाग्या आहेत. आपण सर्वानीच त्यांच्या समवेत काम केल्याचा उल्लेख करून आमदार विखे पाटील म्हणाले, की कोणताही खेळच सर्वांना एकत्र आणण्याचे काम करीत असतो. या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील खेळाडूना संधी निर्माण होतील आणि श्रीरामपूरचा नावलौकीक सुध्दा या स्पर्धेतून होईल.

उद्घाटनाच्या या भाषणात आमदार विखे यांनी शाब्दिक कोट्या केल्या. स्पर्धा श्रीरामपूरला होत असल्या तरी इथली धावपट्टी एवढी सोपी नाही. या धावपट्टीवर सर्व प्रकारचे चेंडू लागावे लागतात. फलदांज गोलंदाज तरबेज असतील, तरी क्षेत्ररक्षक सैरभर झाले असल्याकडे लक्ष वेधत कोण कोणत्या संघात आहे, समजत नाही. त्यामुळेच कप्तान एक हवा. या स्पर्धेतून श्रीरामपूरचा कप्तान ठरेल, आशी सूचक टिपणी  त्यांनी केली.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख