राज्यपालांकडे आमदार विखे पाटील यांचे या कारणासाठी साकडे - MLA Vikhe Patil to the Governor for this reason | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

राज्यपालांकडे आमदार विखे पाटील यांचे या कारणासाठी साकडे

मुरलीधर कराळे
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून मंदिर सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व्यावसायिकांवर ओढवलेल्या अर्थिक संकटाचे वास्तव त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

नगर : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने मंदिर उघडण्याच्या भाविकांच्या मागणीचा अनादर केला असून, याबाबतचा निर्णय जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला आहे. मंदिर बंद असल्याने तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व्यावसायिकांवर आलेल्या अर्थिक संकटाचे गांभीर्य लक्षात घेवून मंदिर सुरू करण्याचे निर्देश आपणच सरकारला द्यावेत, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून मंदिर सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व्यावसायिकांवर ओढवलेल्या अर्थिक संकटाचे वास्तव त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

राज्य सरकारने अनलॉकचे निर्णय करताना सर्वच अस्थापना सुरू करण्याचे निर्णय घेतले. दारुच्या दुकानापासून ते जिम सुरू करण्यास सांगितले. आठवडे बाजारांसह माॅल आणि शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबतही सरकार निर्णय करते, परंतू मंदिर सुरु करण्याच्या मागणीकडे मात्र महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची बाब आमदार विखे पाटील यांनी राज्यपालांकडे स्पष्ट केली.

महाराष्ट्र राज्यातील मंदिरे बंद असल्याने या भागातील छोटे मोठे व्यावसायिक अर्थिक अडचणीत आले आहेत. हाॅटेल, लाॅजिंग व्यवसाय बंद असले, तरी सरकारने हाॅटेल चालकांना घरपट्टी पाणीपट्टी तसेच व्यावसायिक करात कुठेही सवलत दिलेली नाही. मंदिरे बंद असल्याने भाविक येत नसल्याने मागील आठ महीन्यांपासून सर्वच व्यवसाय बंद असले, तरी सहकारी पतसंस्था बॅका आणि खासगी वित्तसंस्थानी कर्जाच्या वसुलीसाठी सुरू केलेल्या तगाद्यामुळे छोटे- मोठे व्यावसायिक पथविक्रेते दुहेरी अर्थिक संकटात सापडले असल्याचे आमदार विखे पाटील यांनी राज्यपालांशी चर्चा करताना सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख