आमदार सुरेश धस यांना अटकेमुळे जामखेडमध्ये `रास्ता रोको` - MLA Suresh Dhas arrested in Jamkhed | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार सुरेश धस यांना अटकेमुळे जामखेडमध्ये `रास्ता रोको`

वसंत सानप
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

जामखेड येथील आमदार सुरेश धस मित्र मंडळाच्यावतीने जामखेड येथील खर्डा चौकात टायर जाळून रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

जामखेड : ऊसतोडणी मंजुरांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे आमदार सुरेश धस यांना आष्टी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटले असून, शेजारच्या जामखेड तालुक्यातही आमदार सुरेश धस समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांनी अटकेचा निषेध नोंदवून सरकारचा धिक्कार केला. 

जामखेड येथील आमदार सुरेश धस मित्र मंडळाच्यावतीने जामखेड येथील खर्डा चौकात टायर जाळून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी सुरेश आण्णा जिंदाबाद !  राज्य सरकार मुर्दाबाद ! अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला होता.  आंदोलकांच्या मते, लोक कल्याणासाठी आणि ऊसतोड मजुरांसाठी संवैधानिक मार्गाने आणि शांततेने आमदार धस यांनी आंदोलन केले. त्यांना आज दुपारी आष्टी पोलिसांनी अटक केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अटकेच्या निषेधार्थ जामखेड शहरातील खर्डा चौकात सुरेश धस मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करीत टायर पेटवून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. या वेळी गणेश डोंगरे, शरद कार्ले, सुनिल जगताप, मनसेचे सनी सदाफुले, अभिजित राळेभात, सुरज पवार, गोरख धनवट, भरत राळेभात यांच्यासह सुरेश अण्णा धस मित्र मंडळाचे जामखेड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख