नगरमध्ये भूमिगत विद्युत तारांसाठी आमदार संग्राम जगताप यांचा प्रयत्न

विद्युत तारांचे जाळे आता जमिनीखाली जाणार आहे. त्यामुळे या भागातील विद्युत तारांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
sangram jagtap.jpg
sangram jagtap.jpg

नगर : ‘‘नवी मुंबईच्या (Mumbai) धर्तीवर शहराच्या विकासकामांसाठी निधी प्राप्त करणार आहे. पुढील काळामध्ये नगर शहर विकसित शहर म्हणून ओळखले जाईल. भवानीनगर परिसरातील विद्युत तारांचे जाळे आता जमिनीखाली जाणार आहे. त्यामुळे या भागातील विद्युत तारांचा प्रश्न मार्गी लागला आहे. याच धर्तीवर संपूर्ण शहरांच्या विद्युत तारा जमिनीतून घेण्यासाठी शासनदरबारी निधीकरिता पाठपुरावा करणार आहे,’’ असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. (MLA Sangram Jagtap's attempt for underground power lines in the town)

नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या प्रयत्नातून भवानीनगरमधील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, संतोष सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासकर, विठ्ठल गुंजाळ, अजित कर्नावट, सूर्यभान शिंदे, ॲड. महेश शिंदे, संतोष ढाकणे, मळू गाडळकर, जॉय लोखंडे, भाऊसाहेब भदार्गे, चंद्रकांत डिक्कर, नीलेश हिंगे, संग्राम सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, ‘‘नगरसेवक गणेश भोसले यांनी साईनगर परिसरामध्ये वृक्षलागवड करून साई उद्यान साकारले आहे. याच धर्तीवर भवानीनगर परिसरातील खुल्या जागेमध्ये उद्यान साकारणार आहे. भवानीनगरमधील रस्त्याची कामे मार्गी लागली आहेत.’’

नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, ‘‘आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळामध्ये प्रभाग १४मध्ये सुमारे चार कोटी रुपयांची विकासकामे सुरू होणार आहेत.’’

हेही वाचा...

कोरोनाचा धोका टळलेला नाही : गोरे

नगर : ‘‘‘ब्रेक दी चेन’ मोहिमेअंतर्गत शासन निर्देशानुसार शहरातील सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. प्रतिबंधक नियमांचे पालन व्हावे, यासाठी महापालिका प्रशासन सतर्क राहणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना करणार आहे,’’ असे प्रतिपादन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी केले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘ब्रेक दी चेन’ मोहिमेतील निर्देशांची महापालिका प्रशासनाने शहरात प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आली. त्याबद्दल येथील (स्व.) रामलालजी ललवानी मेमोरिअल फाउंडेशनतर्फे महापालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त शंकर गोरे व महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कोविडयोद्धा म्हणून फाउंडेशनचे अध्यक्ष अभय ललवानी यांनी सत्कार केला. त्यावेळी गोरे बोलत होते. नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब पवार, उद्योजक योगेश पवार, स्वीय सहायक शेखर देशपांडे, राजू लयचेट्टी, किशोर कानडे, गणेश भंडारी उपस्थित होते.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com