उत्तरप्रदेश घटनेबाबत आमदार रोहित पवार यांचे भाजपला असेही प्रश्न - MLA Rohit Pawar's question to BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

उत्तरप्रदेश घटनेबाबत आमदार रोहित पवार यांचे भाजपला असेही प्रश्न

मुरलीधर कराळे
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

उत्तरप्रदेशमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत आमदार पवार यांनी ट्विटरवरून मत व्यक्त करीत विरोधकांवर टीका केली आहे.

नगर : उत्तरप्रदेश सरकारने मीडियाला रोखून पिडीत कुटुंबाला डांबून ठेवले, हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून केला. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे काहीच का बोलत नाही, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपचे नाव न घेता या पक्षावर टीका केली.

ट्विटरवर मत व्यक्त करताना रोहित पवार यांनी मत मांडले आहे. ``उत्तरप्रदेशात मिडियाला रोखून आणि पिडीत कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करीत आहे. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही? आणखी किती दिवस गप्प बसणार ? की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय? ``

उत्तरप्रदेशमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत आमदार पवार यांनी ट्विटरवरून मत व्यक्त करीत विरोधकांवर टीका केली आहे. उत्तरप्रदेश सरकारने मीडियाला रोखून धरले. तसेच संबंधित पिडित मुलीच्या कुटुंबियांना डांबून ठेवणे हा अन्याय आहे. यावर विरोधक मात्र काहीच बोलत नाहीत. महाराष्ट्राचा, मुंबईचा यापूर्वी ज्यांनी अवमान केला, ते आता काहीच का बोलत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख