आमदार रोहित पवार यांचा राज्यपाल व फडणवीस यांना खोचक टोला - MLA Rohit Pawar slams Governor and Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रोहित पवार यांचा राज्यपाल व फडणवीस यांना खोचक टोला

मुरलीधर कराळे
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

आजवर राज्यपालांनी कलाकार, विरोधी पक्षाचे नेते यांचे म्हणणे एकूण घेऊन सरकारला योग्य ते निर्देश दिले आहेत. आपण अन्नदाता असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतली, असा विश्वास आहे.

नगर : कांद्याची निर्यातबंदी लादल्याने एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यावर जामखेड-कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून राज्यपाल व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

ट्विटमध्ये पवार यांनी म्हटले आहे, की आजवर राज्यपालांनी कलाकार, विरोधी पक्षाचे नेते यांचे म्हणणे एकूण घेऊन सरकारला योग्य ते निर्देश दिले आहेत. आपण अन्नदाता असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतली, असा विश्वास आहे.

विरोधी पक्षनेत्यांचे एकूण राज्य सरकारला कायम `योग्य` निर्देश दिल्याने शेतकरी पुत्र तर अन्नदाता आहे. त्यांना वेळ नक्कीच मिळेल, असा टोला त्यांनी फडणवीस व राज्यपाल कोश्यारी यांना लगावला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील साैंदरे येथील विरेश आंधळकर याने राज्यपालांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, की मी एक पदवीधर असून, वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लाॅकडाऊनच्या संकटामध्ये गावी परतावे लागले. ही केवळ माझी एकट्याची परि्थिती नसून, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची आहे. शहरामध्ये काम करणारी, शिकणारी मुला आता गावाकडे परतली आहेत. आई वडिलांनी आम्हाला शिकवून नोकरीसाठी शहरात पाठविले. शेतीत काम करण्याची इच्छा असतानाही आम्ही नोकरी करत होते. परंतु वैश्विक महामारीमुळे परतावे लागले. शेतीत उत्पन्न काढण्यासाठी जीवाचे रान केले. यंदा निसर्गामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जास्त पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लादल्याने कांद्याचे भाव गडगडणार आहेत. ही सर्व व्यथा मांडण्यासाठी आपणास भेटायचे आहे. त्यासाठी आम्हा शेतकऱ्यांच्या मुलाला वेळ द्यावा, अशी विनंती त्याने राज्यपालांना केली आहे.

यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून राज्यपाल भेटण्यास आवश्य वेळ देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की महामहिम राज्यपाल महोदय हे नागरिकांच्या हक्कांप्रती अत्यंत संवेदनील आहेत. आजवर त्यांनी कलाकार, विरोधी पक्षाचे नेते यांचे म्हणणं एकूण सरकारला योग्य ते निर्देश दिले आहेत. आपण अन्नदाता व पत्रकार असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतली, असा विश्वास वाटतो.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख