आमदार रोहित पवार यांनी दिली राम बन्सी शिंदे यांना चप्पल भेट - MLA Rohit Pawar presents slippers to Ram Bansi Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रोहित पवार यांनी दिली राम बन्सी शिंदे यांना चप्पल भेट

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

राम बन्सी शिंदे असे त्या युवकाचे नाव. पवार यांनी आज या कार्यकर्त्याची भेट घेऊन त्याला चप्पल भेट दिली. याबाबत आमदार पवार यांनी छायाचित्रासह माहिती ट्विट केली आहे.

नगर : कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी आमदार व्हावे, यासाठी त्यांच्या चाहत्यांनी अनेक संकल्प केले. ते निवडून आल्यानंतरच चप्पल घालणार, शर्ट घालणार असे संकल्प होते. अशाच एका चाहत्याची भेट घेऊन आमदार पवार त्याला चप्पल भेट दिली.

राम बन्सी शिंदे असे त्या युवकाचे नाव. पवार यांनी आज या कार्यकर्त्याची भेट घेऊन त्याला चप्पल भेट दिली. याबाबत आमदार पवार यांनी छायाचित्रासह माहिती ट्विट केली आहे. 

त्यांनी म्हटले आहे, की माझ्या आमदारकीसाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी अनेक गोष्टींचा त्याग केला होता. त्यापैकीच थेरगाव इथले राम बन्सी शिंदे हे एक. निवडणुकीत मला यश मिळावं म्हणून त्यांनी चप्पल घालणं सोडलं होतं. काल त्यांची कृतज्ञतापूर्वक भेट घेऊन नवीन चप्पल दिली व त्यांचे आभार मानले, असे पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

एका युवकाने तर वेगळाच संकल्प करून तालुक्याचे लक्ष वेधले होते. रोहत पवार आमदार झाल्याशिवाय अंगात शर्ट घालणार नाही, असा संकल्प त्याने केला होता. पवार आमदार झाल्यावर त्यांनी त्या युवकाचा पोषाख देऊन गाैरव केला. असे अनेक संकल्प मतदारसंघात युवकांनी केले होते. अशा युवकांची भेट घेऊन आमदार पवार यांनी त्यांचे संकल्पपूर्ती केली आहे.

हा तर मोठा योगायोग

जामखेड-कर्जत मतदारसंघात विधानसभेची लढत भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यात झाली. या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या लढतीत रोहित पवार यांनी बाजी मारली. प्रा. राम शिंदे यांच्याच नावाचे नामसाधर्म्य असलेले राम बन्सी शिंदे यांना चप्पल भेट दिल्याने हा विषय जल्ह्यात विशेष चर्चेचा ठरला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख