आमदार रोहित पवारांची कमाल ! अस्तित्त्व हरवून बसलेल्या `तिला` पुन्हा सुंदर रूप - mla rohit pawar latest news, jamkhed rever changed | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रोहित पवारांची कमाल ! अस्तित्त्व हरवून बसलेल्या `तिला` पुन्हा सुंदर रूप

वसंत सानप
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

नागेश्वर मंदिराच्या परिसरात पुन्हा स्वच्छतेचा सुगंध दरवळू लागला आहे. हे परिवर्तन आमदार रोहित पवारांच्या दूरदृष्टीमुळे साध्य झाले.

जामखेड : जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वराच्या प्रांगणातून वाहणारी 'धाकली' नदी स्वतःचे अस्तित्व हरवून बसली होती. आमदार रोहित पवारांचे लक्ष गेले आणि हरवलेले हे वैभव पुन्हा प्राप्त झाले. नदीचे पात्र स्वच्छ, सुंदर होऊन वहाते झाले.

नागेश्वर मंदिराच्या परिसरात पुन्हा स्वच्छतेचा सुगंध दरवळू लागला आहे. हे परिवर्तन आमदार रोहित पवारांच्या दूरदृष्टीमुळे साध्य झाले.

सकाळ रिलीफ फंडातूनही कामे 

बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व अन्य स्वयंसेवी संस्थेने विशेष सहकार्यातून जामखेड शहराच्या प्रवेशद्वाराच्या तोंडावर असलेल्या आणि स्वतःची ओळख आणि अस्तित्व हरवलेल्या नद्यांचे पुनर्जीवन करण्याचा संकल्प आमदार रोहित पवारांनी हाती घेतला आणि काम सुरु केले. या दोन्ही नद्यांचे पुन्नर्जीवन झाले. नद्या स्वच्छ, सुंदर आणि वहात्या झाल्या. गावचं हरवलेले हे वैभव परत मिळालं. 

हेही वाचा... तुमच्या खात्याचे कर्मचारी हलगर्जीपणा करतात

मातुःश्री सुनंदाताईंचे योगदान

आमदार रोहित पवारांच्या मातुःश्री सुनंदाताई पवार यांनी कर्जत-जामखेड ही दोन्ही शहर स्वच्छ, सुंदर व्हावीत; याकरिता 'मिशन' म्हणून काम हाती घेतले आहे. त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वच्छतेचं महत्व नागरिकांना पटवून देऊन याकामी योगदानासाठी आवाहनही केले. ऐवढ्यावरच न थांबता स्वतः श्रमदान करुन स्वच्छतेच्या कामात सहभाग नोंदविला. त्यांच्या पुढाकारानेच
'माझे शहर ; स्वच्छ, सुंदर शहर', ही संकल्पना दोन्ही तालुक्यात राबविली गेली.

याचाच एक भाग म्हणून गावातून वाहणाऱ्या नद्यांचे हरवलेले रूप पुन्हा मुळ रुपात यावे, तुंबलेल्या नद्या वाहत्या व्हाव्यात, यासाठी प्राधान्य दिले. नदी पात्राच्या कडेला, पात्रात असलेले काटेरी झुडपांचे बन काढले. पात्रात साचलेली घाण बाहेर काढली. दगड-धोंड्यांचे असलेले अडथळे हटविलेले. तुंबलेल्या पात्रामुळे निर्माण झालेली गटार हटविली आणि 'विंचरणा' नदी पाठोपाठ 'धाकली' नदी ही स्वच्छ व सुंदर व वहाती केली. 

हेही वाचा... पंकुताई-धनुभाऊंची गळाभेट होणार का पुन्हापुन्हा

धाकल्या नदीला आहे धार्मिकतेची जोड

जामखेड - खर्डा रस्त्या लगत ग्रामदैवत नागेश्वराचे मंदिर आहे. दरवर्षी नागपंचमीच्या मुहर्तावर येथे मोठा यात्रा उत्सव भरतो. येथील नागेश्वराच्या यात्रेलाच 'जामखेडची पंचमी' अशी ओळख मिळाली आहे. हा उत्सव धार्मिक पध्दतीने पार पडतो. येथे पुरातन हेमाडपंती, वास्तुशास्राचा उत्कृष्ट नमुना असलेले नागेश्वराचे शिवमंदिर भक्तांच्या श्रध्देचे ठिकाण आहे. या मंदिराच्या दर्शनी बाजूने जवळून "धाकली" नदी वाहाते. जणूकाही मंदिरात प्रवेश करताना भक्तांचे पाय स्वच्छ धूवूनच मंदिरात प्रवेश मिळणार, अशी ही रचना या धाकल्या नदीची..! मात्र गेली काही वर्षांपासून घाणीच्या साम्राज्यामुळे नदी स्वतः ची ओळख विसरून गेली. मंदिर प्रवेशाचा मार्ग घाणीच्या विळख्यात अडकला. 

सांडपाण्याची व्यवस्था करणे गरजेचे 

मंदिराच्या समोरुन जाणारी धाकली नदी तीनशे मीटर अंतरावर सिमेंट बंधाऱ्यांने आडविली आहे. मंदिराच्या समोरील बाजूकडून शहरातील सांडपाणी वाहून आणणारा अनेक वर्षापासूनचा नाला आहे. या पाण्याची विल्लेवाट लावली, तर पात्रात पुन्हा घाणीचे व गटारीचे साम्राज्य निर्माण होणार नाही. यासाठी उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे. हे काम तस सोपे नाही पण प्रयत्न झाला तर मार्ग निघू शकेल.

पुढच्या टप्प्यात सुशोभिकरण

जामखेडला वरदान ठरलेल्या 'विंचरणा' नदी पाठोपाठ 'धाकली' नदी ही स्वच्छ ,सुंदर 
व वहाती झाली, हे पहिल्या टप्प्यातील काम होते. दुसऱ्यां टप्प्यात हा परिसर विकसित करुन शुशोभिकरणाचे काम हाती घेणार आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख