पाथर्डी : अकोला ग्रामपंचायतीमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांनी दणदणीत विजय मिळवित अॅड. प्रताप ढाकणे यांच्या गटाकडून ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा खेचून आणली आहे.
नारायण पालवे, हरीभाऊ धायतडक, नवनाथ धायतडक, सुभाष केकाण, संभाजी गर्जे, गंगाधर गर्जे, उद्धव माने यांच्या संघटीतपणामुळे विजय मिळाला आहे. अनिल ढाकणे यांच्या पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
ढाकणे गटातील अंतर्गत गटबाजीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांनी अकोला गावात आठ जागा जिंकून बाजी मारली आहे. ढाकणे गटाला तिन जागावर समाधान मानावे लागले.
अकोला गावात अनिल ढाकणे यांची सत्ता होती. अनिल ढाकणे यांनी पॅनलच्या उमेदवारी देताना केलेल्या मनमानी पद्धतीला त्यांच्या गटाच्या काही प्रमुख व्यक्तींनी आक्षेप घेतला होता. त्यावरुन ढाकणे समर्थकांमधे नाराजी होती. ती नाराजीच ढाकणे गटाच्या पराभवाला कारणीभुत ठरल्याची चर्चा आहे. ढाकणे यांच्या कुंटुबातील अनिल ढाकणे व सुमन ढाकणे यांचा पराभव झाला आहे.
पालवेवाडी येथील एक, अकोला गावातील दोन अशा तिन जागा मिळाल्या आहेत. नारायण पालवे, संभाजी गर्जे , नवनाथ धायतडक यांच्यासह पाच जणांचा विजय झाला आहे. हरीभाऊ धायतडक यांचा पराभव राजळे गटाला हुरहुर लावणारा ठरला आहे.
अॅड. प्रताप ढाकणे यांनी गावातील उत्सुकांची बैठक घेवुन सर्वांना सूचना केल्या होत्या. त्यावेळी पॅनल निवडून आला पाहिजे, तुमच्यातील मतभेद बाजुला ठेवा. मला राजकारणात अडचणी उभ्या करू नका, अशा सूचना दिल्या होत्या. तरीही गावातील स्थानिक नाराजांनी गोड बोलुन ढाकणेंना धक्का दिला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रताप ढाकणे यांनी मात्र थेट भाग घेतलेला नाही. त्यांच्या समर्थकांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, प्रभाग तिनमधील अनिल ढाकणे व संभाजी गर्जे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. येथे 216 मतांच्या मताधिक्याने संभाजी गर्जे यांनी विजय मिळविला आहे. संभाजी गर्जे या युवकाने केलेली कामगिरी अकोले गावाच्या राजकारणातील महत्वाची घटना समजली जाते. राजळे समर्थकांनी संघटीतपणे केलेल्या मुकाबल्यामुळे हे शक्य झाले आहे.
Edited By - Murlidhar Karale

