आमदार पवार यांची तत्परता ! दहा जेसीबीच्या साह्याने एका दिवसात कालवादुरुस्ती - MLA Pawar's readiness! Ten days correction in one day with the help of JCB | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार पवार यांची तत्परता ! दहा जेसीबीच्या साह्याने एका दिवसात कालवादुरुस्ती

वसंत सानप
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

पिंपळगाव तलावातून पाणी सोडून महारुळी तलाव भरुन घेतला. हा तलाव भरल्याने वाघा, महारुळी, गुरेवाडी, नान्नज येथील शेतकऱ्यांसाठी रब्बीच्या पिकासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे.

जामखेड : पिंपळगाव आळवा लघु प्रकल्प ओहरफ्लो होताच हे पाणी कमांड ऐरीयातील पाझर तलाव भरुन घेण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेऊन एका दिवसात दहा जेसीबीच्या माध्यमातून सात किलोमीटर लांबीच्या कालव्याची दुरुस्ती केली आणि महारुळी (ता. जामखेड) येथील तलाव भरुन घेतला.

तालुक्यातील शंभर दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असलेला पिंपळगाव (आळवा) लघु प्रकल्प दरवर्षी ओवरफ्लो होतो. मात्र ओहरफ्लोचे पाणी नदिला वाहून जाते. हे पाणी कमांड एरीयातील तलाव भरण्यासाठी वापरले, तर या भागातील शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होईल. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष (कै.) बाबासाहेब पवार ऊर्फ बी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने रोजगार हमी योजनेतून हा तलाव साकारला होता. या तलावामुळे पंचक्रोशीतील विहिरींच्या स्त्रोताला बळकटी मिळून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, असा उद्देश होता. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे हा तलाव दरवर्षी भरत नव्हता.
विशेष म्हणजे या तलावापर्यंत पिंपळगाव (आळवा) लघु प्रकल्पाचा सात किलोमीटर अंतराचा कॅनल पोहचलेला होता. मात्र कॅनलही नादुरुस्त असल्याने आवर्तनच बंद होते, तर ओहरफ्लोचे पाणी सोडण्याचा प्रश्नच नाही. तसा विचारही कोणी केला नव्हता.  

पिंपळगाव तलावातून पाणी सोडून महारुळी तलाव भरुन घेतला. हा तलाव भरल्याने वाघा, महारुळी, गुरेवाडी, नान्नज येथील शेतकऱ्यांसाठी रब्बीच्या पिकासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे. 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख