आमदार निलेश लंके आदर्श काम करणारा भाऊ : सुप्रिया सुळे - MLA Nilesh Lanka's ideal working brother: Supriya Sule | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

आमदार निलेश लंके आदर्श काम करणारा भाऊ : सुप्रिया सुळे

मार्तंड बुचुडे
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

मला राज्यात चांगले आदर्श काम करणारा व नावलौकिक मिळविणारा एक भाऊच या रूपाने मिळाला असल्याचे सांगून लंके यांच्या कामाचा गाैरव केला.

पारनेर : पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या विधानसभा सदस्यपदाच्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण करीत असतानाच गेली वर्षभरात त्यांनी  केलेल्या कामांचा लेखाजोखा वेबसाईटद्वारे मतदार संघातील तसेच राज्यभरातील जनतेसाठी खुले केला आहे.

या वेबसाईटचा प्रारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुंबई मध्ये झाला. या वेळी त्यांनी लंके यांच्या कार्याचा गौवर केला. मला राज्यात चांगले आदर्श काम करणारा व नावलौकिक मिळविणारा एक भाऊच या रूपाने मिळाला असल्याचे सांगून लंके यांच्या कामाचा गाैरव केला.

आमदार लंके यांनी आपल्या आमदारपदाच्या वर्ष परिपूर्तीनिमित्त आतापर्यंत केलेल्या सामाजिक शैक्षणिक तसेच इतरही कामांचा वेबसाईट द्वारे लेखा जोखा जनतेसमोर मांडला आहे. या संकेतस्थळावर जाऊन मतदार संघातील व संघाबाहेरील कुठलीही व्यक्ती लंके यांच्या वर्षभरातील राजकीय-सामाजिक व शैक्षणिक कामाचा लेखाजोखा पाहू शकणार आहेत. या वेळी लंके यांच्यासह तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या कार्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गाैरव केला.

लंके आमदार झाल्यानंतर योजना, विकास कामे, सामाजिक व शैक्षणिक कार्य, कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊनमध्ये केलेले सामाजिक शैक्षणीक कार्य, ऑनलाईन शाळा, पोलिस अॅकेडमी, कोविड केअर सेंटरमधून हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा देऊन महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या आमदारांचा संपूर्ण लेखाजोखा वेबसाईटच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

लंके यांनी निवडणुकीच्या आधीही मतदारसंघातील महिलांना विविध देवस्थानांच्या सहली घडवून आणल्या आहेत. त्यामुळे त्यांचे धार्मिक काम तालुक्यात प्रसिद्ध आहे. विधानसभेसाठी निवडून आल्यानंतर त्यांनी धार्मिक कामांबरोबरच सामाजिक कामांत आघाडी घेतली. कोरोनाच्या काळात कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी ते कायम पुढे राहिले. अडचणीच्या काळात लोकांना दिलेला धीर तालुक्यात इतर कोणत्याही नेत्यांना देता आला नाही. त्यामुळे समाजातून या कामांचे काैतुक होत आहे.

दरम्यान, वर्षभरात केलेली कामे संगणक प्रणालीच्या माध्यमातून सर्वांना पाहता येणार आहेत. एका क्लिकवर कामांची माहिती मिळणार असल्याने कामांमधील पारदर्शकता दिसून येणार आहे. आगामी काळातही केलेल्या कामांचे अपडेटस या वेबसाईटवर टाकण्यात येणार असल्याने त्यांनी किती कामे केली, हे तातडीने दिसून येणार आहे. अशाच प्रकारच्या वेबसाईटस इतर आमदारांनीही कराव्यात, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. आगामी काळातही अशा प्रकारचे प्रयोग इतर नेते करतील, असे मत व्यक्त होत आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख