गुणवंत शिक्षकांना सवलतीसाठी आमदार लंके यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे - MLA Lanka calls on CM for concessions to meritorious teachers | Politics Marathi News - Sarkarnama

गुणवंत शिक्षकांना सवलतीसाठी आमदार लंके यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

राज्य व राष्ट्रीय गुणवंत पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पुर्वीप्रमाणेच दोन वेतनवाढी तसेच प्रवासासाठी मोफत बससेवा पास मिळावा. त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांना रेल्वे प्रवासातही सवलत मिळावी.

पारनेर : राज्य व राष्ट्रीय गुणवंत पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पुर्वीप्रमाणेच दोन वेतनवाढी तसेच प्रवासासाठी मोफत बससेवा पास मिळावा. त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांना रेल्वे प्रवासातही सवलत मिळावी. अशा मागणीचे पत्र आमदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

आमदार लंके यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रात लंके यांनी म्हटले आहे की, राज्यातील राज्य तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दरवर्षी पाच सप्टेंबरला दिल्ली येथे पुरस्काराचे वितरण केले जाते. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांना अशा स्वरूपाचे पुरस्कार दिले जातात. भविष्यात या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात चांगले काम करावे व त्यासाठी त्यांना प्रोहत्सान मिळावे, यासाठी त्यांचा पुरस्कार देउन यथोचित सन्मान केला जातो.

या पुर्वीच्या 30 एप्रील 2084 च्या शासन निर्णयानुसार या पुर्वी अशा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतन वाढ देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांना त्या मिळतही होत्या. त्यानंतर चार सप्टेंबर 2014 च्या शासन निर्णयानुसार आगाऊ वेतनवाढी ऐवजी एकरकमी ठोक रक्कम देण्याचा शासनाचा निर्णय झाला. तो निर्णय 2013-14 पासून लागू करण्यात आला होता. लंके यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, माझ्याकडे अशा अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी पुर्वी प्रमाणेच शिक्षकांना दोन वेतवाढी देण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबयांना बस प्रवास सुद्धा मोफत करण्याची सवलत मिळावी, तसेच रेल्वे प्रवासातही सवलत मिळावी, त्यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करावा. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जिल्हा परीषदेच्या शिक्षक व गुणवत्ता समितीवर निमंत्रीत सदस्य म्हणून घेण्यात यावे, याबाबत शासन पातळीवर निर्णय करण्यात यावा, अशी मागणी आमदार लंके यांनी मुखयमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख