आमदार काळे की सत्यजीत तांबे ! साई संस्थानचे अध्यक्ष कोणत्याही क्षणी जाहीर होणार - MLA Kale Ki Satyajit Tambe! The president of Sai Sansthan will be announced at any moment | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार काळे की सत्यजीत तांबे ! साई संस्थानचे अध्यक्ष कोणत्याही क्षणी जाहीर होणार

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 17 जून 2021

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कुठल्याही क्षणी जाहिर करतील. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस कडून कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे, तर काॅग्रेसपक्षाकडून युवक काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे नाव चर्चेत आहे.

शिर्डी : साईसंस्थानचे (Saibaba Sansthan) विश्वस्तमंडळ निवडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस यांनी एकाचवेळी दावा ठोकला आहे. या दोन्ही पक्षातील रस्सीखेचेतून मार्ग निघाला की नवे मंडळ, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कुठल्याही क्षणी जाहिर करतील. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस कडून कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे, तर काॅग्रेसपक्षाकडून युवक काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे नाव चर्चेत आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील एका मातब्बर राजकीय घराण्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव देखील अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. (MLA Kale Ki Satyajit Tambe! The president of Sai Sansthan will be announced at any moment)

यापूर्वी अध्यक्षपद काॅग्रेसकडे व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काॅग्रेसकडे असे सुत्र होते. मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅग्रेसचे बळ सर्वाधिक आहे. त्यामुळे हे पद आम्हाला द्या असा दावा करीत राष्ट्रवादी काॅग्रेसने आपली मागणी लावून धरली आहे.

शिवसेनेला मुंबईच्या सिध्दीविनायक देवस्थानात तुलनेत अधिक रस त्यामुळे या स्पर्धेत शिवसेना नाही. उपाध्यक्षपद काॅग्रेसला देऊन हा तिढा सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काॅग्रेला संधी मिळाली, तर अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करायची, याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भुमिका महत्वाची राहील. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या गुडबुकमध्ये आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे.पुणे जिल्ह्यातील एका मातब्बर राजकीय घराण्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव देखील अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. 

विश्वस्तपदासाठी शिर्डीतील बरीच मंडळी इच्छुक आहेत. त्यात राष्ट्रवादी काॅग्रेसच्या स्थानीक पदाधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. साईसंस्थान व ग्रामस्थांमध्ये समन्वय ठेऊन कारभार चालावायचा असेल, तर तिनही पक्षाच्या स्थानीकांना संधी द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्याबाबतही महाविकास आघाडी सरकारला विचार करावा लागेल. येत्या दोन तीन दिवसात अध्यक्षपदा बाबतचा तिढा सुटेल आणि नवे मंडळ अधिकारावर येईल. अशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
 

हेही वाचा..

थोरात म्हणतात, हा असेल माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख