MLA Jagtap's request to the Dairy Development Minister on the question of farmers | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आमदार जगतापांचे मंत्र्यांना साकडे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 मे 2020

खरीप हंगाम एक महिन्यावर आल्यामुळे त्याची पूर्वतयारी करण्यासाठी बैलांची गरज आहे. बहुतेक शेतकरी याच काळात बैल खरेदी करून आपली शेती करीत असतात. सरकारने कोरोनाच्या पार्श्वभऊमीवर विशेष नियम घालून देऊन अशी परवानगी दिल्यास शेतकऱ्यांचे काम सुरू होऊ शकेल.

नगर : पावसाळा सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामांसाठी जनावरे खरेदी विक्रीची लगबग असते. कोरोनाच्या संकटामुळे हा विषय पूर्णपणे बाजूला राहिला. याविषयी आता आमदार संग्राम जगताप यांनी लक्ष घालीत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले आहे. शासकीय नियम पाळून जनावरे खरेदी-विक्रीसाठी वाहतुकीस परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

देशभर कोरोनाचे संकट असल्यामुळे लाॅकडाऊन आहे. दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना जनावरे खरेदी-विक्री करता येत नाही. अत्यावश्यक बाब म्हणून कृषी विभागाने शेतीमालाच्या खरेदी-विक्री व वाहतुकीबाबत नियोजन केले आहे. याच धर्तीवर जनावरांची खरेदी-विक्री व वाहतूक चालू होणे गरजेचे आहे. खरीप हंगाम एक महिन्यावर आल्यामुळे त्याची पूर्वतयारी करण्यासाठी बैलांची गरज आहे. बहुतेक शेतकरी याच काळात बैल खरेदी करून आपली शेती करीत असतात. सरकारने कोरोनाच्या पार्श्वभऊमीवर विशेष नियम घालून देऊन अशी परवानगी दिल्यास शेतकऱ्यांचे काम सुरू होऊ शकेल. अन्यथा या वर्षी बरीच शेती पडित राहण्याची शक्यता आहे. जनावरांचे बाजार चालू करणे शक्य नसले, तरी वैयक्तिक जनावरांची खरेदी-विक्री सुरू करून शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा...

शेतमाल विक्रीसाठी तब्बल 20 किलोमीटरची पायपीट

अकोले : पहाटे पाच वाजता उठून आकाशने शेतात जाऊन शेंगा व मक्याचे कणसे एका गोणीत भरले. दहा किलोमीटर पायी चालत राजूरला आला. पण गावात लॉकडाऊन असल्याने त्याने एका मंदिर परिसराच्या कोपऱ्यात बसून तोंडाला मास्क बांधून त्या शेंगा 80 रुपये किलो व मक्याचे कणीस 5 रुपयाला एक प्रमाणे विकू न 300 रुपये मिळविले. त्यानंतर पुन्हा तो दहा किलोमीटर पायी घरी आला. असा तब्बल 20 किलोमीटरचा प्रवास त्याने पायी केला.

राजूर परिसरातील वादुळशेत येथील आकाश पडवळ या विद्यार्थ्याने 12 वी पर्यंत शिक्षण घेतले. आयटीआयमध्ये प्लम्बिंगचाही कोर्स केला, परंतु नोकरी नसल्याने आपल्या शेतात राबून जिरायती शेतीत कष्ट केले. वाल, भुईमूग, मका लावून आपले आईवडील भाऊ, बहीण यांना आधार दिला. कोरोनामुळे व लॉकडाउनच्या संकटात त्याची शेतीही अडचणीत सापडली. त्यामुळे कुटुंब चालविण्याची त्याच्यावर वेळ आली. त्याही परिस्थितीवर मात करून त्याने मका, टोमॅटो व वालाचे पिक घेतले. राजूरला विक्रीसाठी जाण्यासाठी त्याने तब्बल 20 किलोमटीरचा प्रवास पायी केला. शेतमाल विक्रीतून त्याला 300 रुपये मिळाले. आता अशाही परिस्थितीत तो शेतातील माल राजूरला घेवून जात आहे. खासगी वाहने बंद असल्याने पायी प्रवास करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख