आमदार डाॅ. किरण लहामटे यांना वैभव पिचड यांचे हे खुले आव्हान - MLA Dr. This is Vaibhav Pichad's open challenge to Kiran Lahamate | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

आमदार डाॅ. किरण लहामटे यांना वैभव पिचड यांचे हे खुले आव्हान

शांताराम काळे
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

आगामी नगरपंचायतची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार आहे. मित्रपक्षाने अजूनपर्यंत विचारणा केलेली नाही. तशी वेळ आल्यास त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असे पिचड यांनी स्पष्ट केले.

अकोले : सध्याचे आमदार लोकहिताच्या गप्पा मारतात. परंतु लोकहिताची कामे करत नाहीत. गेल्या वर्षभराच्या संकल्पपूर्तीमध्ये निवडणुकीत यांनी किती आश्वासने दिलेली वास्तवात उतरली आहेत, याचा लेखाजोखा सर्वांच्या पुढे आणावा, असे खुले आव्हान माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी पत्रकारांसी बोलताना दिले.

आगामी नगरपंचायतची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार आहे. मित्रपक्षाने अजूनपर्यंत विचारणा केलेली नाही. तशी वेळ आल्यास त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असे पिचड यांनी स्पष्ट केले.

पिचड म्हणाले, की आपल्या काळातील मंजूर कामांचे उद्घाटन सध्याचे आमदार घेत असून, खरे म्हणजे त्यांनी मंजूर कामाची तारीख किंवा तसा फलक कामाच्या ठिकाणी उभा करण्याची नितांत गरज आहे, असा टोला पिचड यांनी लगावला.

पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत ते म्हणाले, की पक्ष सोडून जाणाऱ्यांशी चर्चा करून मनधरणी केली, मात्र त्यांचा भाजप सोडण्याचा निर्णय ठाम होता. निवडणुकीत माझा प्रचार केला, आणि मी जर आमदार झालो असतो, तर हे पक्ष सोडून गेले असते का ?असा सवाल माजी आमदार वैभवराव पिचड यांनी करीत शेवटी कोणाची मनधरणी किती करायची, यालाही मर्यादा आहेत. माझ्यावर विश्वास असलेले माझे सखे सोबती माझ्याबरोबर आहेत, निश्चितच या पुढे जोमाने सर्वजण काम करतील, असा विश्वास पिचड यांनी व्यक्त केला.

भाजपची नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी ही सर्व सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवतील. कोरोना व इतर सर्व बाबींचा विचार करण्यास वेळ लागला म्हणून ही कार्यकारिणीची निवड करण्यास उशीर झाला आहे. जुन्या नव्यांचा ताळमेळ बसविताना व पद मर्यादा कमी असल्याने काही नाराज असतील परंतु ते संयमी असल्याने येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व एकदिलाने काम करणार असून, भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे पिचड यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीच्या कमी निधीला आमदारच जबाबदार

मोदी सरकारची ही दुसरी टर्म असून, त्यांनी शेतकर्‍यांच्या व सर्व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या काळात राज्य सरकारने तालुक्यासाठी काहीही मदत केली नाही. ग्रामपंचायतीचा विकास कामांचा निधी राज्य शासनाने परत घेतला. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनी या कामी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता त्यामध्ये राजकारण आणून खोडा घातला. अतिवृष्टीची निधी कमी आला याला. आमदार जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

नगरपंचायतने करोनाच्या काळात अतिशय चांगले काम केले. तर अगस्ती सहकारी साखर कारखान्याने कोविड सेंटर उभारून औषधेही उपलब्ध करून दिली. मात्र लोकप्रतिनिधी व शासन तालुक्यासाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी कमी पडले आहे. तालुक्यातील सर्व संस्था ह्या चांगले काम करीत असून, या पुढेही अतिशय जोमाने काम चालू राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख