babanrao-pachpute.jpg
babanrao-pachpute.jpg

आमदार बबनराव पाचपुते कोरोना पाॅझिटिव्ह, घरीच क्वारंटाईन

अखेर कोरनाने मला काठलेच. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने मी माझी कोरोना चाचणी केली असता, मी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

नगर : श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची चाचणी केली होती. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

पाचपुते यांनी म्हटले आहे, की अखेर कोरनाने मला काठलेच. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने मी माझी कोरोना चाचणी केली असता, मी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मला कोणतीही लक्षणे नसून, तब्येत ठणठणीत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घ्यावी आणि शक्यतो डाॅक्टरांचा सल्ला लक्षात घ्यावा. आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशिर्वादाने मी लवकरच आपल्या सेवेत हजर होईल.

पाचपुते स्वतःच्या निवासस्थानी क्वारंटाईन झाले आहेत. त्यांंना कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

दरम्यान, नगर जिल्ह्यात आतापर्यंत 64 हजार 60 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.47 टक्के आहे. आज जिल्ह्यात 141 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले असून, 171 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकूण रुग्णसंख्या 66 हजार 404 झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये सुरू केलेले कोरोना सेंटरही अनेक ठिकाणचे बंद करण्यात आले आहेत. तसेच महापालिका, सेवाभावी संस्थांनी सुरू केलेली कोरोना सेंटरही बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा नियमितपणे सुरू झाल्या असून, कोरोनाची भिती उरली नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. देवस्थाने सुरू झाल्याने लोक पर्यटन करू लागले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक नागरिकांना मास्क सक्तीचे केले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत नियम मोडणारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

आता प्रतीक्षा कोरोना लशीची

कोरोना लशीची महाराष्ट्राबरोबरच नगर जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर सुरूवातीला आरोग्यसेवक, तसेच जनतेशी संपर्क येणाऱ्या लोकांना प्राधान्याने दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांचे लक्ष या लशीकडे लागले आहे. लसीचे वितरण कशा पद्धतीने होणार, याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारीही केली आहे. त्यामुळे लस उपलब्ध होताच ती कोणाला आधी द्यायची, हे प्रशासन ठरवणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com