आमदार आशुतोष काळे भेटले शरद पवारांना, केली महत्त्वाची मागणी - MLA Ashutosh Kale met Sharad Pawar and made an important demand | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार आशुतोष काळे भेटले शरद पवारांना, केली महत्त्वाची मागणी

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

नव्याने घोषीत झालेला हा राष्ट्रीय महामार्ग अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडे हस्तांतरीत झाला नाही. त्यासाठी आपण सबंधितांसोबत चर्चा करून हे काम मार्गी लावू.

शिर्डी : सावळिविहीर ते कोपरगाव या अंतरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू व्हावे. त्यातील तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दुर व्हाव्यात. यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी काल ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना साकडे घातले.

हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाकडे लवकरात लवकर हस्तांतरीत व्हावा, यासाठी आपण पुढाकार घ्यावा. अशी मागणी त्यांच्याकडे केली. 

हेही वाचा... शिर्डीतील साईसंस्थानच्या रुग्णालयात मोठे आर्थिक षडयंत्र

याबाबत माहिती देताना काळे म्हणाले, की आपण काल पवार यांची मुंबईत भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. सावळीविहीर ते कोपरगाव या अंतरातील रस्ता पुढे मध्यप्रदेशातील सेंधव्या पर्यत जाईल. त्यास राष्ट्रीय महामार्ग 752 जी हा क्रमांक देण्यात आला. नव्याने घोषीत झालेला हा राष्ट्रीय महामार्ग अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत झाला नाही. त्यासाठी आपण सबंधितांसोबत चर्चा करून हे काम मार्गी लावू, असे अश्वासन पवार यांनी या भेटीत दिले.

या रस्त्याची सध्या अवस्था बिकट झाली. अपघात व बळींची संख्या वाढत चालली. वहाने नादुरूस्त होत आहेत. या रस्त्यावरून दररोज एक लाख मेट्रिक टन वजनाच्या जवळपास दहा हजार वाहनांची वर्दळ असते. शेजारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी देवस्थान आहे. देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा... आमदार लंके यांनी सुचविला या प्रश्नावर पर्याय

अपघाताचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत पडले आहेत. या रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम तातडीने व्हावे, यासाठी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाकडे लवकरात लवकर हस्तांतरीत होणे गरजेचे आहे. या वेळी झालेल्या चर्चेनंतर पवार यांनी आपण यात लक्ष घालून हे काम मार्गी लावू, असे सांगितले.

सावळिविहीर ते कोपरगाव या अंतरातील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने अपघात वाढले आहेत. तांत्रिक बाबींच्या पुर्तता झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोल्हार ते कोपरगाव या अंतरातील खड्डे (पॅचेस) बुजविण्याचे काम येत्या दहा मार्च पासून सुरू होणे अपेक्षीत आहे. आपण सबंधित अधिकाऱ्यांना सोबत संपर्क साधून हे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या आहेत, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रश्नी आता शरद पवार लक्ष घालणार असल्याने हा विषय मार्गी लागेल, अशी आशा या परिसरातील गावांमधून व्यक्त होत आहे. तसेच हा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा, अशी मागणीही प्रवाशांमधून होत आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख