बंद ढाब्यावर मंत्र्यांचे जेवण ! उस्मानाबाद-बीडकारांना गडाखांचा साधेपणा भावला

मंत्री गडाख वाहानातून आपला जेवणाचा डब्बा घेवून उतरले. यांनी थेट धब्याच्या शेडमध्ये असलेल्या 'बाजे'वरच भारतीय बैठक मारून जेवायला बसले. या वेळी त्यांच्याबरोबर असणार्‍यांनीही आपले जेवणाचे डबे काढत तेथेच जेवण केले.
shankarrao gadakh.png
shankarrao gadakh.png

नेवासे : मोठा राजकीय वारसा असूनही अतिशय मृदु, संवेदनशील, अन प्रेमळ स्वाभावाचा सर्वसामान्यांचा नेता म्हणून जनतेत ओळख असलेले नेवासे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे सहज साधेपणाचा अनुभव अनेकांनी अनुभवलेला आहे. त्यांच्या या साधेपणामुळे तालुक्यातील पहिल्या फळीच्या नेत्यांपासून, शेतात राबणार्‍या मजुर असो की गल्लीतील एखादा तरुण सर्वांनाच ते आपल्या जवळचे वाटतात. असाच एक अनुभव शनिवारी (ता. 15)  स्वातंत्र्यदिनी उस्मानाबाद-बीड जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या अनेक नागरिकांनी अनुभवला. त्यांच्या या साधेपणामुळे तर अनेकजण आश्चर्येचकीतच झाले, तर अनेकांनी कौतुकही केले. 

शिवसेनेचे मंत्री गडाख हे पालकमंत्री असलेल्या उस्मानाबाद जिल्हाचा दोन दिवसांचा  दौरा आटोपून शनिवारी सकाळी नगरला येत असताना त्यांनी आपल्या वाहनचालकाला उस्मानाबाद-बीड महामार्गावर एका बंद असलेल्या ढाब्यासमोर गाडी थांबण्याचे सांगितले. मंत्री महोदयांचे वाहन तेथे थांबले. 'बंद ढाब्यावर कशाला? या विचाराने बरोबर असणारे काहीकाळ विचारात पडले. दरम्यान मंत्री गडाख वाहानातून आपला जेवणाचा डब्बा घेवून उतरले. यांनी थेट धब्याच्या शेडमध्ये असलेल्या 'बाजे'वरच भारतीय बैठक मारून जेवायला बसले. या वेळी त्यांच्याबरोबर असणार्‍यांनीही आपले जेवणाचे डबे काढत तेथेच जेवण केले.

दरम्यान, राज्याचा एक कॅबिनेट मंत्री चक्क बंद ढाब्यावर थांबून डब्यात जेवण करत आहे. मंत्र्याचा हा साधेपणा पाहून परिसरातील अनेक नागरिक आश्चर्यचकित झाले. त्यातच ही बातमी सर्वत्र पसरली. दरम्यान मंत्री गडाख जेवण करत असतांनाचे फोटो उस्मानाबाद, बीड, नगर जिल्ह्यात सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाल्याने मंत्री गडाख यांचा हा साधेपणा अनेकांना भावाला.

मंत्री झाल्यावर पोलिसांना इतर खूप काम असते, म्हणून सरकारने दिलेली स्वत:ची पोलिस सुरक्षा स्वत: पोलिस पोलिस विभागाला विनंतीकरून सुरक्षा नाकारणारे मंत्री शंकरराव गडाख यांचा हा साधेपणा या आधीही राज्यातील जनतेने अनुभवला आहे.          

मंत्री गडाखांच्या साधेपणाचे असेही अनुभव 

मंत्री शंकरराव गडाख यांचे साधेपणाचे अनुभव अनेकांनी अनुभवलेले आहे. त्यात ते सोनई येथील चौकात बसून सर्वसामान्यांबरोबर चहा घेणे असो, किंवा घोडेगावच्या जनावरांच्या बाजारात शेतकर्‍यांबरोबर चहा टपरीच्या बाकावर बसून समस्यांवर चर्चा करत चहा घेणे असो. मंत्री झाल्यावरही ते दुचाकीवरून शेतकर्‍यांच्या वस्तीवर जावून गाठीभेटी घेणे. तसेच अनेक  धार्मिक, विवाहसह सार्वजनिक कार्येक्रमांसह सर्वांच्याच सुख-दुखा:त ते सहभागी असतात. नेवासे तालुक्यासाह नगर जिल्ह्यात त्यांच्या साधेपणाचाची नेहमीच चर्चा असते. आणि तो साधेपणा सर्वांनाच भावतोही. 

माझ्या ढाब्यावर मंत्री थांबले हे भाग्य

“माझ्या छोट्या ढाब्यावर मंत्री जेवण्यासाठी थांबतील, असा विचार मी स्वप्नातही कधी केला नव्हता. ढाब्यासमोरून अनेक आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी यांच्या वाहानांचे ताफे येतांना-जातांना पाहिले. मात्र कॅबिनेट मंत्री असूनही इतके साधेपणा प्रथमच पाहिला. ते येथे जेवणासाठी थांबले हे माझे भाग्यच समजतो, असे मत बीड-उस्मानाबाद महामार्गावरील चारभाई ढाबाचालक परवेज चाैधरी यांनी व्यक्त केले.

मला अभिमान वाटला

मंत्र्यांचा साधेपणा प्रथमच पाहत आहे. कोणताही बडेजाव न करता मंत्र्यांना धाब्यावर सर्वसामान्यांसारखे जेवताना पाहिल्यावर आश्चर्य वाटले. तसेच माझ्या जिल्ह्यातील ते पालकमंत्री आहेत, याचा अभिमानही वाटला, असे मत उस्मानाबाद येथील संतोष राऊत यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com