मंत्री शंकरराव गडाख होम क्वारंटाईन, पत्नीचा अहवाल पाॅझिटिव्ह - Minister Shankarrao Gadakh Home Quarantine, wife's report positive | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री शंकरराव गडाख होम क्वारंटाईन, पत्नीचा अहवाल पाॅझिटिव्ह

मुरलीधर कराळे
शनिवार, 18 जुलै 2020

नेवासे विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे जलसंधारणमंत्री यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती सुनता गडाख यांचा कोरोनाचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो पाॅझिटिव्ह असल्याने मंत्री गडाख स्वतः होम क्वारंटाईन झाले आहेत.

नगर : राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने गडाख स्वतः होम क्वारंटाईन झाले आहेत. याबाबत गडाख यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांचाही स्वॅब घेण्यात आला असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

याबाबत गडाख यांच्या स्विय सहायकांनी सांगितले, की मंत्री गडाख यांचा अहवाल येणे बाकी आहे. पत्नीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने मंत्री गडाख यांनीही स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले असून, स्वॅब तपासणीसाठी दिला आहे.

नेवासे विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे जलसंधारणमंत्री यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती सुनता गडाख यांचा कोरोनाचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो पाॅझिटिव्ह असल्याने मंत्री गडाख स्वतः होम क्वारंटाईन झाले आहेत. याबाबत केलेल्या ट्विट मध्ये गडाख म्हणतात, ``काल दि. 17 जुलै रोजी माझी पत्नी यांची कोविड टेस्ट पाॅझिटिव्ह आली असून, आज शनिवारी दि. 18 जुलैला माझा स्वॅब दिलेला आहे. त्यामुळे मी स्वतः होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. आपणही घरी रहा, सुरक्षित रहा,`` असे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख