मंत्री शंकरराव गडाखांसह ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख कोरोना पाॅझिटिव्ह - Minister Shankarrao Gadakh along with senior leader Yashwantrao Gadakh corona positive | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री शंकरराव गडाखांसह ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख कोरोना पाॅझिटिव्ह

विनायक दरंदले
सोमवार, 5 एप्रिल 2021

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासह कुटुंबातील अन्य चार सदस्यांनी  केलेल्या कोरोना तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

सोनई : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासह कुटुंबातील अन्य चार सदस्यांनी  केलेल्या कोरोना तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

मागील वर्षी पत्नी सुनिता गडाख कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर मंत्री गडाखांनी इतरांची काळजी म्हणून गृहविलगिकरणात थांबले होते. मंत्री गडाख पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर सर्व परिवाराने कोरोना तपासणी केली. ज्येष्ठ नेते गडाखांसह अन्य चार सदस्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. गडाख यांनी १९ मार्च रोजी लस घेतली होती.

माझा अहवाल पॅाझिटिव्ह आल्यामुळे मी गृह विलगिकरणांत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेवून तातडीने तपासणी करून घ्यावी. सर्वांना माझी विनंती आहे की, शासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच आपल्या घरातील सदस्यांची काळजी करावी. मास्क वापरा, नियमित हात धुवा व घराबाहेर पडू नका, असे आवाहन मंत्री गडाख यांनी सोशलमिडीया द्वारे केले आहे.

 

हेही वाचा...

शनिमंदिर दर्शनासाठी आजपासून बंद 

सोनई : प्रशासनाच्या आदेशानुसार आज पहाटेच्या आरतीनंतर शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. याशिवाय गुढीपाडवा यात्रा व उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द करण्यात आला, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली. 

कोरोनाची स्थिती लक्षात घेवून विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत व पोलिसाने एकत्रित निर्णय घेवून आज सोमवारच्या पहाटे आरती सोहळा झाल्यानंतर दर्शन व्यवस्था बंद केली. महाद्वारासमोरील दर्शन रांगेत संरक्षण कठडे टाकून मंदिरात जाण्याचा मार्ग बंद केला. ध्वनिक्षेपकावरुन याबाबत ग्रामस्थ, व्यावसायिक व भाविकांना सुचना देण्यात आली. 

13 एप्रिल रोजी असलेली गुढीपाडवा यात्रा, कावड मिरवणूक व उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द करण्यात आला. या बैठकिस देवस्थानचे अध्यक्ष बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, तांत्रिक अधिकारी नितीन शेटे, माजी सरपंच बाळासाहेब बानकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल उपस्थित होते. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख