सोनई परिसरातील ग्रामपंचायतीवर मंत्री गडाखांचा झेंडा  - Minister Gadakh's flag on the Gram Panchayat in Sonai area | Politics Marathi News - Sarkarnama

सोनई परिसरातील ग्रामपंचायतीवर मंत्री गडाखांचा झेंडा 

विनायक दरंदले
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

सरपंच निवडीच्या सर्व गावात सोनई व शनिशिंगणापुर पोलिस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवला होता.

सोनई : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे गाव असलेल्या सोनई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनंजय सखाराम वाघ, तर उपसरपंचपदी प्रसाद हारकाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोनई  परिसरातील सर्व ग्रामपंचायतीवर मंत्री गडाख गटाने बाजी मारली आहे. 

हेही वाचा.. निघोजच्या ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण

ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जी. एम .नांगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरपंच वाघ यांच्या नावाची सूचना सुनिता पवार यांनी केली, तर उपसरपंच हारकाळे यांच्या नावाची सूचना प्रभाकर गडाख यांनी केली.
निवडीनंतर सेवा संस्था अध्यक्ष विश्वास गडाख व अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. प्रकाश शेटे गटाकडून निवडून आलेल्या एकमेव सदस्य बैठकीस गैरहजर होत्या.

हेही वाचा... जिल्हा बॅंकेत धावतेय सहमती एक्सप्रेस

सरपंच निवडीच्या सर्व गावात सोनई व शनिशिंगणापुर पोलिस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवला होता. सर्व ग्रामपंचायतीवर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांचे प्रभुत्व राहिले. बेल्हेकरवाडी, बऱ्हाणपुर व वांजोळीच्या निवडी मतदान घेवून झाल्या. अन्य सर्व गावांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान, या ग्रामपंयातींकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
 

पुणतांबे-कोपरगाव रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी 

पुणतांबे : पुणतांबे- कोपरगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे डांबरीकरण फुटल्याने वाहनांमुळे धुळीचे लोट उठतात.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनासाठी गाव रस्त्यावर उतरेल, असा इशारा सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी दिला आहे. 

या रस्त्याच्या कामासाठी तीन वर्षांपूर्वी सुमारे दोन कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, दोन वर्षांतच रस्त्याची वाट लागली. रस्त्यालगत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यांच्या अवजड वाहनांमुळे रस्ता होत्याचा नव्हता झाला आहे. डांबरीकरण फुटल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चारचाकी सोडा; दुचाकी वाहनांनादेखील रस्ता उरला नाही. परिसराला नगर जिल्ह्याशी जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने, त्यावर मोठी वाहतूक असते. कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. 

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे रस्ता फुटला आहे. मात्र, त्यांना कोणीच बोलत नाही. बांधकाम विभागाने पत्रव्यवहार केला आहे, असे सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख