रामदास आठवले यांनी सांगितल्या शंकरराव कोल्हे यांच्या आठवणी - Memories of Shankarrao Kolhe narrated by Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

रामदास आठवले यांनी सांगितल्या शंकरराव कोल्हे यांच्या आठवणी

मनोज जोशी
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

गेल्या पाच वर्षाच्या काळात माजी आमदार कोल्हे यांनी मतदार संघातील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे.

कोपरगाव : राज्यातील साखर कारखानदारी व सहकारी चळवळीला मार्गदर्शन करणारे, समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करणारे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्या सहवासात आम्ही घडत गेलो. समाजातील तळागाळापर्यंतच्या घटकांसाठी काम करण्याची उर्जा त्यांच्यामुळेच मिळाली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले नगर दाैऱ्यावर आले असता त्यांनी सहकार महर्पी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. `संजीवनी`चे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी स्वागत केले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या वेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध समस्या मांडून विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी केली. 

आठवले म्हणाले, की गेल्या पाच वर्षाच्या काळात माजी आमदार कोल्हे यांनी मतदार संघातील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाचा विकास करून समाजाला न्याय देण्याच्या मिशनमध्ये मला दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने समाजाला न्याय देण्याचे, समाजात परिवर्तन करण्याच्या कामाला गती आली.

बिपीन कोल्हे म्हणाले, की सामाजिक चळवळीच्या माध्यमातून तळागाळातील घटकांना बरोबर घेउन मंत्री आठवले यांनी आपला कतृत्वाचा आलेख उंचावला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील, घरातील, झोपडीतील कार्यकर्त्यांना ओळखण्याचे त्यांचे कसब आणि खेडयात जाऊन समस्यां समजून घेण्याची पद्धत त्यांना उच्च पदावर घेउन गेली. कार्यकर्त्यांना जीवापाड जपणारा माणूस आणि त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकणारा आठवले हे एकमेव नेता असल्याचे कोल्हे म्हणाले. 

या वेळी सुमित कोल्हे, रिपाईंचे प्रदेश सचिव विजय वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्टाचे अध्यक्ष राजाभाउ कापसे, दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, शहराध्यक्ष दत्ता काले, `भाजयुमो`चे शहराध्यक्ष अविनाश पाठक, कैलास खैरे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख