एकनाथ खडसे यांनी जागविल्या गांधी, राठोड यांच्या आठवणी - Memories of Gandhi and Rathore awakened by Eknath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

एकनाथ खडसे यांनी जागविल्या गांधी, राठोड यांच्या आठवणी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजीमंत्री (कै.) दिलीप गांधी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच शिवसेना कार्यालयात भेट देऊन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (कै.) अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नगर :  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे माजीमंत्री (कै.) दिलीप गांधी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच शिवसेना कार्यालयात भेट देऊन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (कै.) अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली.

(कै.) गांधी यांचे नुकतेच दिल्लीत कोरोनामुळे निधन झाले. खडसे यांनी गांधी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. गांधी यांनी आयुष्यभर भाजपचे काम निष्ठेने केले. त्यांच्या अचानक निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला. नगरच्या विकासासाठी त्यांचा कायम आग्रह असे. कोणतेही काम हाती घेतल्यानंतर त्याचा पाठपुरावा करणे व ते काम मिळविणे, हे त्यांचे वैशिष्ट्ये होती. त्यांचे काम आगामी पिढीला स्मरणात राहिल. अशा शब्दांत त्यांनी गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी तसेच कुटुंबिय उपस्थित होते.

खडसे यांनी नगरमधील शिवसेना कार्यालयास भेट देऊन राठोड यांचा यांना श्रद्धांजली अर्पण केली. राठोड यांच्याशी असलेल्या त्यांच्या मैत्रिबाबत त्यांनी माहिती सांगितली. या वेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापाैर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, गणेश कवडे आदी उपस्थित होते.

 

हेही वाचा..

कोरोनाने बाजार बंद 

पारनेर : तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याने तालुक्यातील काही गावात लॉकडाऊन, तर काही गावात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. तसेच सुपे येथील तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारात होणारी गर्दी विचारात घेऊन हा आठवडे बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात तहसीलदार ज्योती देवरे यांनी जाहीर केला आहे. 

तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. अनेक जण खासगी ठिकाणी कोरोनाची चाचची करीत आहेत. तसेच खासगी ठिकाणीच उपचारही करून घेत आहेत. मात्र कोरोनाचे अनेक रूग्ण सुप्त अवस्थेत आहेत. प्रत्यक्षात कोरोना रूग्णांची संख्या व कागदावरील संख्या यात मोठी तफावत आहे. लोक कोणात्याच प्रकारची काळजी घेताना दिसून येत नाहीत. अनेक दुकानांत सँनिटाझर ठेवलेले नाही, तर अनेक लोक बाजारात व दुकानाकतही विना मास्क फिरताना दिसत आहे.

बाजारात तसेच सार्वजनिक ठिकाणी अनेकजण कामाशिवाय फिरताना आढळून येत आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनाही लोक दाद देत नाहीत, तर अनेकदा पोलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना लोकांशी वाद घालावे लागत आहेत.

तालुक्यातील राळेगणसिद्धी गाव 14 दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे, तर पारनेर, पाडळी रांजणगाव आदी ठिकाणी अंशतः कन्टेंमेंन्ट झोन तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गावात संशयित रूग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्य कर्मच्याऱ्यांसमावेत अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यामिक शिक्षकांचे एकत्रीत पथक तयार करण्यात येणार असल्याचे देवरे यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोणालाही घरी विलगीकरण करून थांबता येणार नाही. त्यासाठी कोविड सेंटर उभारले आहे. पिंपळगाव रोठे येथे तीनशे रूग्णांचे कोविड सेंटर कोरठण खंडोबा देवस्थाच्या भक्तनिवासात उभारल्याचेही तहसीलदार देवरे यांनी सांगितले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख