मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्या बाळासाहेब विखे यांच्या आठवणी - Memories of Balasaheb Vikhe shared by Chief Minister Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्या बाळासाहेब विखे यांच्या आठवणी

मुरलीधर कराळे
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

बाळासाहेब विखे पाटील यांच्यासारखा एक खंदा माणूस दिसत होता. मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी होती. एक कार्यक्रम होता.

नगर : विखे पाटील यांचे घराणे तसे काॅंग्रेसचे. परंतु शिवसेनाप्रमुखांनी कोंडलेला हिरा बाहेर काढत कोंदणात बसविला. बाळासाहेब विखे पाटील यांना मंत्री केले, अशा आठवणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या.

दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विखे पाटील यांच्या आठवणी सांगितल्या. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल धन्यवाद देऊन ठाकरे म्हणाले, की बाळासाहेब विखे पाटील जणू माझ्या समोरच आहेत, असे वाटते. एक मोठी आठवण आहे. त्या वेळचा काळ भारावलेला होता. बाळासाहेब विखे पाटील यांच्यासारखा एक खंदा माणूस दिसत होता. मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी होती. एक कार्यक्रम होता. आम्ही त्या कार्यक्रमास उपस्थित होतो. कार्यक्रम संपल्यानंतर एकमेकांना थांबून आम्ही बोलत होतो. तेवढ्यात बाळासाहेब एकट्या गर्दीतून व्यासपीठावरून उतरून आले. आम्ही बोलत होतो. त्यांनी आमच्याजवळ येऊन म्हणाले, मी बाळासाहेब विखे पाटील. त्या वेळी सर्व जण आवाक झाले.

ठाकरे म्हणाले की, विखे पाटील घराणे जिद्दीने पुढे आले आहे. परिस्थितीचा सामना सर्वच करीत असतात. पण कोणत्या कारणासाठी आपण देह वेचतो आहोत, ते पाहिल्यानंतर बाळासाहेबांचे व्यक्तीमत्त्व दिसून येते.या पुस्तकाचा उल्लेख नेमका कसा करायचा, असा पश्न आहे. हे पुस्तक मी चाळले. अनेकजण परिस्थितीची शिकार बनतात. पण या घराण्याने तसे होऊ दिले नाही. त्यांनी परीस्थिती बदवली. एक सरकारी कामात साचेबद्ध उत्तर मिळते, परंतु असे का, याचे उत्तर बाळासाहेबांनी शोधले. ओढ्यावरचा पूल बांधायचाय. तेही बाळासाहेब बारकाईने पाहत. त्यात काही बदल सुचवायचे. अधिकारी सांगायचे त्यात खर्च वाढेल. परंतु बदल केला नाही, तर त्याचा उपयोग काय. पाणी तर साचलं पाहिजे. असे म्हणून ते बदल करण्यास भाग पाडत. 

ठाकरे म्हणाले, की परिस्थितीत बदल हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे. सहकार चळवळ कशी उभारली हे ते वडिलांकडून शिकले. भुताच्या माळावर नंदनवन कसे फुलवले, या सर्व अशक्यप्राय करणाऱ्या गोष्टी आहेत. शेतकऱ्यांची जी संस्था असते, ती जपली पाहिजे. ते काचेचे भांडे आहेत. खरा मालक समाज आहे. आपण केवळ विश्वस्त आहोत, हे ते वारंवार सांगत.सभासदांच्या हिताला बाधा येईल, असा कोणताही निर्णय ते घेत नसत. अत्यंत चाैकसपणे ते निर्णय घेत. हा माणूस आताही माझ्या नजरेसमोर उभा आहे. हे सर्व पाहत त्यांनी स्वतःचे आयुष्य नाही, तर जनतेचे आयुष्य बदलले. ते भाषणे आणि पुस्तक लिहित बसले नाहीत, तर त्यांनी आधी केले आणि नंतर सांगितले. त्यांनी स्वतः मार्गक्रमण केले. मार्ग तपासून पाहिला.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख