बैठक निष्फळ! राज्यात दूध दरवाढीचे आंदोलन तीव्र होणार - Meeting in vain! The agitation for milk price hike will intensify in the state | Politics Marathi News - Sarkarnama

बैठक निष्फळ! राज्यात दूध दरवाढीचे आंदोलन तीव्र होणार

शांताराम काळे
मंगळवार, 21 जुलै 2020

मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांचे केवळ प्रश्न ऐकून घेतले. याबाबत मंत्रालयात चर्चा करून आगामी काळात कोणती योजना द्यायची, याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

अकोले : दूध दरवाढीबाबत आज मंत्रालयात बोलालेली बैठक निष्फळ ठरली आहे. दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी कोणतेच ठोस आश्वासन न दिल्याने तसेच कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने आगामी काळात आंदोलन सुरूच ठेवी, असा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे.

दूधप्रश्नाबाबत दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी आज दुध उत्पादकांसोबत आॅनलाईन बैठक घेतली. या वेळी राज्यातील काही शेतकरी नेते उपस्थित होते. बैठकीमध्ये दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्यावतीने दुग्ध व्यवसायाबाबत शेतकऱ्यांनी मागण्या मांडल्या. मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांचे केवळ प्रश्न ऐकून घेतले. याबाबत मंत्रालयात चर्चा करून आगामी काळात कोणती योजना द्यायची, याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. आज कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत. दुधाला 30 रुपये प्रतिलिटर दर द्यावा, तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात दुधाचे 10 रुपये अनुदान जमा करावे, या दोन प्रमुख मागण्या आहेत. याबाबत मात्र शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घेतला आहे.

आजच्या बैठकित निराशाच पदरी : नवले

याबाबत बोलताना डाॅ. नवले म्हणाले, की आजच्या बैठकितुन शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडल्याने आम्ही या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतो आहोत. उद्या शेतकरी संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या संबंधितांशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवू. जोपर्यंत सरकार हस्तक्षेपाची योजना शेतकऱ्यांसाठी देत नाही, आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने दहा रुपये कसे जातील आणि तीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना कसा मिळेल, यासाठी शासन शेतकऱ्यांना मदत करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही. आंदोलनाची भूमिका किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात हे आंदोलन पेटणार आहे. सध्या दगडावर दूध ओतून आंदोलन होत आहे. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख