नगर जिल्ह्यात आज 535 कोरोना रुग्णांचा उच्चांक, 6 जणांचा मृत्यू  - A maximum of 535 patients died in Nagar district today | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात आज 535 कोरोना रुग्णांचा उच्चांक, 6 जणांचा मृत्यू 

मुरलीधर कराळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जिल्ह्यात आज 535 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तसेच 6 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. आजच्या वाढलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्याने 5 हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे.

नगर : जिल्ह्यात काल सायंकाळपासून ते आज सायंकाळपर्यंत 535 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तसेच 6 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. आजच्या वाढलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्याने 5 हजारांचा टप्पा पूर्ण केला असून, आजपर्यंत ५ हजार ५०८ रुग्णांची नोंद झाली आहे.

आज आलेल्या पाॅझिटिव्ह अहवालात जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३४, अँटीजेन चाचणीत २८४ आणि खासगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २१७ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ७९५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३ हजार ६३९ इतकी झाली आहे. काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत २४ रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका क्षेत्रात ९ नेवासे १३, जामखेड २ अशा २४ रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर आणखी १० रुग्णांचा अहवाल बाधित आढळून आला. यात नेवासे तालुक्यातील चांदे येथे 1, नगर शहरातील 2, अकोले 7 अशा रुग्णांचा समावेश होता.

अँटीजेन चाचणीत आज २८४ जण बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर २७, राहाता ९, पाथर्डी २५, नगर ग्रामीण १५, श्रीरामपुर १२,  कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदे ६०, पारनेर १७, राहुरी ६, शेवगाव ४३, कोपरगाव १२, जामखेड २२ आणि कर्जत ३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, महापालिका १७५, संगमनेर ५, राहाता १३, पाथर्डी ४, नगर तालुका ५, श्रीरामपूर ४, कॅन्टोन्मेंट १, नेवासे १, श्रीगोंदे १, पारनेर ४, शेवगाव २, कोपरगाव १ आणि कर्जत येथील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 639 असून, मृत्यू झालेल्यांची संख्या 75 आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी नगर शहरात जोरदार उपाययोजना सुरू असल्या, तरी संख्या मात्र कमी होत नाही. नागरिकांमध्ये कोरोनाविषयक भिती कमी झाली असून, नागरिक वैयक्तिकरित्या काळजी घेताना दिसत नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख