मराठा आरक्षण ! महसूलमंत्री थोरात यांच्या दारात भगिणी आणि मेव्हण्यांचे आंदोलन - Maratha reservation! The agitation of sisters and brothers-in-law at the door of Revenue Minister Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

मराठा आरक्षण ! महसूलमंत्री थोरात यांच्या दारात भगिणी आणि मेव्हण्यांचे आंदोलन

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आज आंदोलने सुरू केली आहेत. राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या दारासमोर आंदोलन करण्याचे नियोजन होते. त्यानुसार आज हे आंदोलन करण्यात आले.

नगर : मराठा आरक्षणाबाबत राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलने सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून आज संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दारातच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनास थोरात यांच्या भगिणी नगराध्यक्ष दुर्गा तांबे व मेव्हणे आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनीही पाठिंबा दिला असल्याने तेही या आंदोलनात सहभागी झाली.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात राज्यभर आज आंदोलने सुरू केली आहेत. राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या दारासमोर आंदोलन करण्याचे नियोजन होते. त्यानुसार आज हे आंदोलन करण्यात आले. 

आज सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अमोल खताळ, अशोक सातपुते, खंडू सातपुते आदींनी अनेक कार्यकर्त्यांसह थोरात यांचे घर गाठले. तेथे धरणे आंदोलन सुरू केले. दुर्गा तांबे व डाॅ. तांबे यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्यामुळे बंधुच्याच दारात भगिणी व मेव्हण्याचे धरणे आंदोलन हा चर्चेचा विषय झाला. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख